Ramnavmi-Shobhayatra-baithak
अकोला

श्रीरामनवमी शोभायात्रा समितीची बैठक संपन्न

अकोला: धर्म, संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत झांकी व दिंडींच्या माध्यमातून होते. सांस्कृतिक परंपरेचे स्मरण आणि सामाजिक जाणिवची जागृती करणार्‍या झांकींचा सहभाग शोभायात्रेत असतो. हा सहभाग शहरातील विविध भागातून आणि सर्व सामाजिक, आर्थिक गटातून असल्याने राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढते, असे प्रतिपादन आ. गोवर्धन शर्मा यांनी केले.

ते विश्व हिंदू परिषद, श्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारा राणी सती धाम येथे आयोजित झांकी, दिंडी समितीच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत १५१ झांकी, दिंडींच्या सहभागाची निश्चिती बैठकीत करण्यात आली. यावेळी मंचावर श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा,विहिंपचे राहुल राठी, गणेश काळकर, प्रकाश लोढिया, प्रा.नरेंद्र देशपांडे, विलास अनासने, कृष्णा शर्मा, राजेश मिश्रा आदी उपस्थित होते.गत ४० वर्षांपासून श्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारा भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते.

या शोभायात्रेत शहरासह पंचक्रोशीतील भजनी दिंडी, विविध झांकी, देखावे यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.या बैठकीत १५१ झांकी आणि दिंडीचा सहभाग शोभायात्रेत रहावा असे नियोजन आणि संकल्प करण्यात आला. झांकीच्या सहभागासाठी तरुणांमध्ये विशेष चढाओढ दिसून आली. शहरातील धर्मप्रेमी नागरिकांनी ३० मार्च रोजी आायोजित शोभायात्रेत दिंडी आणि झांकीद्वारे सहभाग नोंदविणार्‍या रामभक्तांनी शिस्त आणि अनुशासन पाळावे, तर मातृशक्ती आणि नागरिकांनी लाखोंच्या संख्येने सहभागी होत रामभक्ती प्रकट करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीचे संचालन सुरज भगेवार यांनी केले.

या बैठकीत प्रकाश घोगलिया, सुनील पसारी, गजानन दाळू गुरुजी, डॉ. अभय जैन, डॉ.प्रवीण चव्हाण, कृष्णा शर्मा, संजय रोहणकार, अनुप शर्मा, मनीष बाछुका, स्वानंद कोडोंलीकर, सुरेश कुलकर्णी, हरिओम पांडे, सुरेंद्र जयस्वाल, निलेश पाठक, सुधाकर बावस्कर, प्रताप विरवाणी, संदिप निकम, नितीन जोशी, संजय दुबे, संदिप वाणी, अमर कुकरेजा, राजेश भारती, आशिष भीमजियानी, बाळकृष्ण बिडवाई,किशोर मांगटे पाटील, वसंत बाछुका, राजेश अग्रवाल, संदीप राऊत, हेमंत सरदेशपांडे, ज्योती टोपले, माणिकराव नालट,भरत मिश्रा, अमरीश शुक्ला, डॉ अशोक ओळंबे, पंडित हेमंत शर्मा, दिपक बजाज, मनोज कस्तुरकर, संजय ठाकूर, संतोष पांडे, संतोष वर्मा, अश्विन पांडे, गोपाल केला, संजय केंदळे, अविनाश देशमुख, नरेंद्र गोडाले, अजय शर्मा, राजेंद्र गिरी, विलास शेळके, विनोदसिंग ठाकूर, निलेश घावरे, रोहित तिवारी, निलेश निन्नोरे, रेखा नालट,दुर्गा जोशी, कमला भोबळे,आशा ईचे, संतोष भारती, श्रीकांत गावंडे, मनीष बुंदेले, लक्ष्मी अकोटकर, कमला सोनटक्के, विमल नाचवणे,पुष्पा वानखेडे, साधना येवले,छाया तोडसे, संतोषी शर्मा, आनंद चोबे, आनंद कदम, मनोज साहू, सारिका देशमुख, मालती रणपिसे, मनीषा भुसारी, चित्रा बापट, अश्विनी सुजदेकर आदी उपस्थित होते.