Law-conference
अकोला

श्रद्धासागर येथे कायदेविषयक शिबिर संपन्न;तालुका विधी सेवा समिती चे आयोजन

अकोट: अकोट शहरातील दर्यापूर रोड स्थित श्रद्धासागर येथे जागतिक सामाजिक न्याय दिवस व जेष्ठ नागरीकांचे अधिकार विषयी कायदेविषयक शिबीराचे आयोजन तालुका विधी सेवा समितीतर्फे करण्यात आले होते.या कार्यकमाला श्री चकोर श्रीकृष्ण बाविस्कर, जिल्हा न्यायाधीश – १ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, अकोट ,श्री बि. बि. चौहान, सह दिवाणी न्यायाधीश क, स्तर, अकोट, श्री विनायक एम. रेडकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, अकोट सुरेंद्र पोटे, अध्यक्ष, विधीज्ञ संघ, अकोट, विजय चव्हाण, सचिव, विधीज्ञ संघ, अकोट, तसेच विधीज्ञ वर्ग आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थित होता, जागतिक सामाजिक न्याय दिवस व जेष्ठ नागरीकांचे अधिकार याविषयी वक्ते अँड. राजेश तायडे, अ‍ॅड. राहुल वानखडे, अँड. महेश देव आणि तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष यांनी सर्व उपस्थित श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यकमाला श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोटचे अध्यक्ष श्री ह भ प वासुदेवराव महाराज महल्ले, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, सहसचिव अविनाश गावंडे, विश्वस्त महादेवराव ठाकरे, नंदकिशोर हिंगणकर, पुरुषोत्तम मोहोकार, व्यवस्थापक अमोल मानकर, जेष्ठ नागरिक संघाचे जयकृष्ण वाकोडे, मधुकरराव पुंडकर आदि मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता विजय जितकर, सामाजिक कार्यकर्ता, अकोट आणि न्यायालयीन कर्मचारी,पोलीस कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.या कायदेविषयक शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राधिका देशपांडे, विधीज्ञ, प्रास्ताविक अ‍ॅड. अवंती जोत, विधीज्ञ, तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. विजय चव्हाण, विधीज्ञ, यांनी मानले. श्री संत वासुदेव महाराज यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित या कायदेविषयक शिबिराला श्रोत्यांची भरघोस उपस्थिती लाभली.