अकोला

शॉट सर्किट मुळे आग गोठ्याला लागलेल्या आगीत ४५ बकर्‍या व २७ पिल्ले भस्म

मुर्तिजापूर : तालुक्यांतील कंझरा येथे सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने झालेल्या शॉट सर्किट मुळे गुराच्या गोठ्याळा आग लागून आगीत ४५बकर्‍या व २७पिल्ले जगीच जळून खाक झाल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार निंबा येथिल प्रकाश शामराव पांगसे वय ६० याच्या गोठ्यला सायंकाळ च्या दरम्यान सुटलेल्या वार्‍या मुळे शॉट सर्किट झाल्याने गोठ्यास आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देवकर, पोलिस उपनरीक्षक मानकर,हेड पोलिस कॉन्स्टेबल संजय खंडारे पोलिस कॉन्स्टेबल ठाकरे, सायाम यांनी तत्काळ घटना स्थळी जाऊन मुर्तिजापूर अग्नी शामक दलाद पाचारण करून आग अतोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आग अटोक्यात आणली मात्र लागलेल्या आगीत प्रकाश शामराव पंगसे याच्या गोठ्यातील ४५बकर्‍या २७पिल्ले व सेंत्रिंग चे लाकडी समान,गुरा ठोरा साठी साठून ठेवलेले कुटार यांची अक्षरशः राख रांगोळी होऊन लाखो रुपयांची हानी झाली असली तरी सुदैवाने यात प्राणहानी टाळून मोठी दुर्घटना टळली तरी बकर्‍याना या आगीत जीव गमवावे लागले.