इटकळ प्रतिनिधी -हैदर शेख : दिनांक 9 मार्च ते 11मार्च दरम्यान परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र व आत्मा विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 15 शेतकरी गटातील एकूण 500 लाभार्थ्यांना सविस्तर असे शेंद्रीय विषयावर प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षणामध्ये सर्व विकास संस्थेचे श्री भारती शिवाजी यांनी बायोडायनिक सिपीपी कल्चर. दशपर्णी अर्क. निमार्क. कंपोस्ट खत गांडूळ खत या निविष्ठा कशा बनवायच्या याचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
तसेच pkvy अंतर्गत प्रामाणिकरण पद्धत गुणांकन पद्धत याची माहिती बाळासाहेब खैमनार यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भगवान अरबड सेंद्रिय शेतीचे महत्व आणि फायदे याचे सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या केंद्र समन्वयक श्रीमती वर्षा मरवाळीकर यांनी आहारामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले परंपरागत कृषी विकास योजना या योजनेची पद्धत आणि संकल्पना याविषयीचे मार्गदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री नागेश उगलमुगले यांनी केले सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रकल्प संचालक आत्मा उस्मानाबादचे श्री जेपी शिंदे. केविकेच्या वर्षा मरवाळीकर . शास्त्रज्ञ भगवान आरबाड. तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग. बिओसर्टचे बाळासाहेब खेमनार. सर्व विकास संस्थेचे शिवाजी भारती. एस एस पी च्या दिपाली थोडसरे. अर्चना माने.राणी शिराळ. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नागेश उगलमुगले. वैभव लोंढे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव लोंढे यांनी केले.