ताज्या बातम्या

शुध्दोधन दारोकर यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड

अकोला प्रतिनिधी१२ फेब्रुवारी:-महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये कार्यरत असलेले, शुध्दोधन दारोकार यांची सलग तिसऱ्यांदा  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,ही निवड  अकोला परिमंडळ ची आढावा बैठक हॉटेल वैधम अकोला येथे संपन्न झालेल्या बठकीत करण्यात आली.
अकोला परिमंडळ अंतर्गत परिमंडळ अकोला,मडळ वाशिम मंडळ, बुलढाणा मंडळ, अकोला शाखेची सर्वसाधारण सभा हाँटेल वैधम मंगरुळपीर रोड अकोला येथे केंद्रीय उपाध्यक्ष पि एल हेलोडे यांच्या अध्यक्षतेखाली व परिमंडळ अध्यक्ष एस एम दारोकार सचिव संदीप वानखडे कार्याध्यक्ष पी एस अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती सुरवातीला संघटनेचे प्रेरणास्थान क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, रावबहादूर नारायण लोखंडे  डाॅ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यांनंतर विषय सुचिनुसार कामकाज संपन्न होऊन  महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले
सन 2022 चा विभागनिहाय सभासद वार्षिक अहवाल चा आढावा घेण्यात आला
दिनांक 8/1/2023 रोजी केंद्रीय कार्यकारिणी सभा विषयवृतात माहिती देण्यात आली.
सन 2023 या वर्षासाठी अकोला परिमंडळ अकोला ची कार्यकारणी निवड करण्यात आली
एस एम दारोकार यांची अकोला परिमंडळ अध्यक्ष पदी तिसर्यादा सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली
दारोकार हे अमरावती परिमंडळ अकोला च्या सरचिटणीसपदी सुध्दा तीनवेळा विराजमान झालेले आहेत त्या मुळे त्याना असणारा कामाचा अनुभव अधिकारी पदाधिकारी यांच्या सोबत असनारा संपर्क कर्मचारी यांच्याप्रती असनारी निष्ठा पकड विश्वास हे निवडिचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले
सदर निवडिचे श्रेय त्यांनी
महेश कातखेडे उपकार्यकारी अभियंता जळगाव जामोद, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पि एल हेलोडे उपकार्यकारी अभियंता अनिल शेगावकर , सहाय्यक अभियंता अमोल ठोंबरे, साहाय्यक अभियंता व्हि डि बोरकर सतोष इंगोले मगरुळपीर प्रशांत भगत,एस एस गव ई नांदुरा अनिल तायडे बुलढाणा बाळासाहेब दाबणे अविनाश भागवत मनोज वाकोडे शरद घुघे शिलवंत डोगरे  पुथ्वीराज वानखडे डि बि मनवर एस जी रोकडे व सर्व विभागीय अध्यक्ष सचिव परिमंडळ कार्य कारणी सभासद वाशिम मंडळ बुलढाणा मंडळ अकोला मडळ  यांना देत आहेत.