क्राईम

 शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या ५ प्रतिष्ठिनांवर ईडीच्या धाडी

वाशिम३०ऑगस्ट :- वाशिम-यवतमाळच्या शिवसेनेच्या  खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यात वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.