पातूर :– तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामाची तसेच शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निधीची चौकशीच्या मागणी करीता शिर्ला ग्रामपंचायतचे सदस्य सागर कढोणे यानी पंचायत समीतीच्या कार्यालया समोर सोमवार पासुन आमरण उपोषणला सुरवात केली आहे,
शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या आरखड्यात तरतुद नसताना कृती आराखड्यात फेरफार करुन मुरुम टाकण्यात आला प्रत्यक्षात ५० बरासची रायल्टी असताना लाखो रुपयाचा मुरुम टाकण्यात आला. स्ट्रीट लाईटच्या नावाखाली शासनच्या निधी मधुन अपहार करण्यात आला. २५ /१५ अंतर्गत ईस्टीमेट नुसार काम न करता निधीचा खर्च दाखवुन खर्च करण्यात आला.याची चौकशी करण्यात यावी. वृक्ष लागवड योजने अंतर्गत प्रत्यक्षात वृक्ष न लावता अवैध बिले काढण्यात आली. अनेक बाधकामा करीता नियमबाह्य पध्दतीने दाखले देण्यात आले.तसेच मॉन्टो कारला कपंनीला नाहरकत प्रमाणपत्र देण्या करीता मासिक मीटींग मध्ये कोणताही विषय नसताना नियमबाह्य कंपनीला जमीन खराब आहे गट नंबर ८२/१ क्षेत्र ४०७८ हेक्टर आर जमीनी मधुन मुरुम मटेरीअल देण्या करीता नियबाह्य नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले दलीत वस्ती योजने २५ . १५ अंतर्गत मध्ये शिर्ला ग्रामपंचायत फंड व इतर फंडामधुन कामे करण्यात आली दर कामे निकृष्ठ दर्जाची असुन वार्ड क्रमाक ५ मध्ये पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली या मध्ये सचिव व सरपंच यांनी संपुर्ण निधी खर्च केला आहे अद्याप ७० टक्के काम अपुर्ण या मुळे या भागातील नागरीत पाण्या पासुन वंचीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रमाणे अनेक नियम बाह्य ठराव घेवुन खर्चाला मान्यता देण्यात आली या सर्व कामाची १ तो ३३ नूसार चौकशी करण्यात यावी अनेक वेळी चौकशीची मागणी करुन कोणतेही चौकशी न करण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी सोमवार पासुन पंचायत समीती समोर आमरण उपोषणला सुरवात केली आहे.
या प्रकरणी शिर्ला ग्रामपंचायचे सचिव राहुल उंदरे यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयन्न केला असता त्याचा मोबाईल स्विच ऑफ आला
ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्थहीन आहे.ग्रामपंचायतचे काम सर्व नियम पध्दतीने करण्यात आले असुन केवळ राजकीय विरोध म्हणुन त्यानी हे आरोप केले आहे, कोणत्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असुन केवळ ग्रामपंचायत मधील नागरीकाच्या विकासाच्या दुष्टीने सभागुहाने विकासाचे निर्यण घेतले असुन विरोधकाना केवळ आरोप करण्याचे काम असुन गावाच्या विकास करीता सर्वानी सोबत येणे गरजेचे आहे – सौ अर्चनाताई शिंदे सरपंचा शिर्ला ग्रा.प.
शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत सचिव व सरपंच यांनी केलेल्या कामाची १ ते ३३ नुसार चौकशी करण्यात यावी या सोबतच आपण केलेल्या सर्व कामाची चौकशी जो पर्यत होणार नाही तो पर्यत आपले उपोषण सुरु राहणार – सागर कोढोणे ग्रा.प. सदस्य शिर्ला