अकोला : दिवाळीप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुढीपाडव्यानििमत्त ३ लाख ३६ हजार ४०३ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखरआणि १ लिटर पामतेल मिळणार आहे.
त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे मागणीही नोेंदवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येते. वििवध घटकांतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते.शिंदे -फडणवीस सरकारला शंभर दविस पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ गतवर्षी दविाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने गरीबांसाठी शंभर रुपयांतचार वस्तू देण्याची घोषणा केली होती.
एक किलोरवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलाचा संच देण्यात आले होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना दविाळी सणानििमत्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त शिधाजिन्नस संचाचे वाटप शासनामार्फत करण्यात आले होते.
आता अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधरकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणांनििमत्त आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.आनंदाचा शिधा ‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा देण्यात येणार आहे.
हा शिधा देण्यासाठी आवश्यक जिन्नसांची खरेदी करण्यासाठी ‘महाटेंडर्स’ या ऑनलाइन पोर्टलद्वारे २१ दविसांऐवजी १५ दविसांच्या कालावधीत नििवदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ४०३ शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
दविाळीनििमत्त अवघ्या १०० रुपयांत चार शिधावस्तू वितरीत करण्यात आल्या. मात्र दविाळी पूर्वी शिधावस्तू न पोहोचल्याने वितरण प्रक्रियेत गोंधळ झाला होता. अनेक ठिकाणी दिवाळी झाल्यानंतर शिधा संचाचे वितरण करण्यात आले होते. त्यामध्ये ऑनलाइन वाटपाचाही खोडा निर्माण झाला होता. दरम्यान यंदा मात्र शासनाने एक महिन्यापूर्वीच शिधा वितरीत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.