अर्थ राजकीय

शिंदे-फडणवीस सरकारची बजेट एक्स्प्रेस सुस्साट

शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांना गिफ्ट

मुंबई: शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांना खूश एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यात शेतकर्‍यांना सहा हजार रुपयांचा सन्मान निधी, शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा पाच लाख, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांना अर्ध्या तिकिटांत एसटीचा प्रवास आणि राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार अशा घोषणांची आतिषबाजी केली.

महिलांना आता मासिक २५,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त. यापूर्वी ही मर्यादा मासिक १०,००० रुपये होती, ती आता २५,००० रुपये . दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पाऊल.उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदेफडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.

बृहन्मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि रायगड जिल्हा या तीन क्षेत्रात विमानचालन चक्की इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कराचा दर २५ टक्क्यांहून आता १८ टक्के. असे करून हा कर बंगळुरू आणि गोव्याच्या समकक्ष- वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना २०२३ जाहीर.

ही नवीन अभय योजना १ मे २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत. दि. १ मे २०२३ रोजी प्रलंबित थकबाकीसाठी योजना लागूकोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी २ लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, १ लाख लहान व्यापार्‍यांना लाभ कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रक्कम माफ, सुमारे ८०,००० मध्यम व्यापार्‍यांना लाभ.- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : ३४९ कोटी रुपये दिले/आणखी ७४१ कोटी रुपये देणार.

केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महारार्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी पेटारा उघडला आहे. केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजनेची घोर्षाला शेतकर्‍यांच्या खात्यावर केंद्राच्या ६ हजार रुपयांसह महारार्षाला शेतकर्‍याच्या खात्यावर १२ हजार रुपये जमा होतील.

दवाखान्यात आता पाच लाखांपर्यंत उपचार मोफत

राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा आरोग्य क्षेसासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रासाठी ३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेची व्याप्ती आता दीड लाखावरून पाच लाख इतकी करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. तर राज्यभरात ७०० नवीन स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.देशाची वाटचाल पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे सुरु असताना त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा एक ट्रिलियन डॉलर्स असावा असा प्रयत्न राज्यसरकारचा असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर ७५ हजार देणार

राज्याच्या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात मांडण्यात आली असून त्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये देण्यात येणार आहेत. मुलगी सज्ञान झाल्यानंतर मुलीला रोख ७५ रुपये देण्यात येतील. या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला ५००० रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर ४००० रुपये, सहावीत गेल्यानंतर ६००० रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर ८००० रुपये देण्यात येतील. मुलगी १८ वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख ७५,००० रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्याचं स्वागत केलं.