अकोला

शहरात मोक्याच्या ठिकाणी २६ हॉकर्स झोन तयार करा मगच अतिक्रमणे हटवा !

सर्वधर्म समभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघटनेची मागणी

अकोला: शाखा अकोल्याच्या वतीने दि.२७/०३/२०२३ महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध इशारा धरणे आंदोलन अकोला शहरामध्ये प्रशासनाच्या वतीने मनमानी पद्धतीने कर वसुली सुरु आहे. मात्र त्या तुलनेत जनतेला सुविधा मिळत नसल्याने सर्वधर्म समभाव फूटपाथ व फेरी विक्रेते व जनतेतर्फे धरणे आंदोलन करीत आहोत.

या धरणे आंदोलन मध्ये फूटपाथ व फेरी विक्रेते व जनतेने सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष घनश्याम भटकर यांनी केले आहे. अकोला महानगरपालिका तर्फे अव्याच्या सव्वा मालमता कर वसूल करण्यात येत आहे. तो पन्नास टक्के (५०ज्ञ्) कमी करण्यात यावा. पोटापाण्यासाठी छोटा-मोठा व्यवसाय करून उदर निर्वाह करणार्‍यावर वारंवार रस्त्याच्या कडेला अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येते. त्यासाठी आधी शहरात मोक्याच्या ठिकाणी २६ हॉकर्स झोन देण्यात यावे. त्यानंतरच कार्यवाही सुरु करण्यात यावी.

झोपडपट्टीत साफसफाई करण्याकडे दूर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे त्याठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात याव्या. नाल्यांची स्वच्छता व्हावी, शहरातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त व्हावा, यासह विविध मागण्यांसाठी इशारा धरणे आंदोलन घनश्याम भटकर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. प्रशासन मस्त, अधिकारी सुस्त, जनता त्रस्त असल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. जर स्थानिक प्रशासनाने १ मे पर्यंत जनतेच्या रास्त मागण्या पूर्ण केल्या नाही तर ८ मे ला जनआक्रोश मोर्चा सर्व श्रमिक मजूर फूटपाथ व फेरी विक्रेता व जनतेतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल.

नंतर जोपर्यन्त मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलने तीव्र होत राहतील. इशारा धरणे आंदोलनाचे आयोजक :- घनश्याम भटकर (संस्थापक अध्यक्ष), जयंत अग्रवाल (कोषाध्यक्ष), अँड. अर्चनाताई गावंडे (कायदे विषयक सल्लागार), अ‍ॅड. रवींद्र पोटे, अ‍ॅड. इस्माईल मेगन उर्फ इस्माईलभाई टीव्हीवाले, डॉ. अरुण पारीख, डॉ. धनंजय नालट, डॉ. जगदीश भट्टड, डॉ. प्रदीप शर्मा, डॉ. सुजय पाटील, ह. भ. प. रमेशभाऊ काकड, महाजन पांडे, प्रेम आनंदानी, बाळूभाऊ शाहू, अमोल पावनकर, प्रकाश धनभर, अमोल मोहोकर, रुपेश मोहोकर, सारिका साटोटे, मीनाबाई भोंगळ, शंकर चोपडे, मंगलाबाई कावरे, महादेव आपोतीकर, राजी कली, शेख इम्रान, शेख सलीम, शेख सय्यद, तौसिफ सय्यद, आशिक मिरजोडीन, फिरोज खान, साजिद खान, शारुख शाह, फातिउल्ला भाई, पीर खा., बबलू, केवीन पांडे, प्रवीण ठाकूर, ज्ञानेश्वर विसपुते, गजानन मालोकार, मिथुन टाकसाळकर, रामा तायडे, नंदू भडंगे, सुभाष कृपलानी, प्रकाश गुल्हाने, लक्ष्मण कुर्डीवळ, ओंकार पांडे, कासमभाई चव्हाण, फिरोझ खान, श्रीकृष्ण गावंडे, प्रदीप म्हसने, संजय चौधरी, संजय धायडे, महेंद्र गाढते, बिरजू जाधव, प्रकाश वासनकार, शबीरभाई, विजय बुलबुले, हरीश एडने, सुनील नवथळे, प्रशांत बोर्डे, निलेश व्यवहारे, शुभम उकर्डे, नारायण मेहसरे, प्रकाश मेहसरे, हकीमभाई डब्बेवाले, दीपक थोटांगे, संतोष जोहरी, शिवा माल्टे, सुधाकर टेटू गणेश ठोसर, अरुण जाधव, अर्जुन बनकर, धन्नू दुबे गिरीधर सुरबे, अशोक बनकर, अरविंद आंगडे, संतोष काळे, प्रेमभाऊ आनंदानी, महादेव वरणकार, गणेश ठाकूर, किसन जवरे शारदा जवरे, ज्योती बिल्लेवार, कीर्तीमाला मेहसरे, दीपाली बिल्लेवार व हजारोच्या संख्येने जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल करिता प्रशासनाने गोर गरीब जनतेचा अंत पाहू नये व मागण्या मान्य न झाल्या नाईलाजाने तीव्र आंदोलने छेडण्यात येतील.