अकोला

शहरातील दारूची वाहतूक करणाऱ्यांवर विशेष पथकांची छापमारी!


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
अकोला प्रतिनिधी:-१६ऑक्टोबर रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने,अकोला शहरातील दारूची वाहतूक करणाऱ्यांवर विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत,दारूची अवैध पणे वाहतूक करणाऱ्यांवर छापेमारी करीत,देशी दारूच्या पेट्यांसह १लाख रुपयांच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे मिळाली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या छापमारीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार१६ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना खबऱ्या मार्फत गोपनीय माहितीच्या आधारे ,शहरातील पोलीस स्टेशन खदान,पोलीस स्टेशन रामदास पेठ, पोलीस स्टेशन अकोट फाईल हद्दीत दारूची वाहतूक करणाऱ्यांवर छापमारी करून तीन आरोपींना अटक करण्यात आली.यामध्ये खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शासकीय गोडाऊन समोरुन कौलखेड येथील३५वर्षीय नागेश भाऊराव पावसाळे याला5हजार७६०रुपयांच्या देशी दारूच्या९६क्वॉर्टर सहीत अटक केली, तर रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या टॉवर चौक ते स्टेशन रोडवरील अग्रेसन चौकतातून आंबेडकर नगर येथील रहिवासी श्याम शांताराम अवचार याला दुचाकी क्रमांक एम. एच.३०-डब्लू-३६७६ वरून  १९२देशीक्वॉर्टर घेऊन जात असतांना अटक केली. त्याच्याकडून दुचाकी सह११ हजार५२०रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अकोट रोडवरील वल्लभनगर फाट्यावर नाकाबंदी अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शेलार फाईल मध्ये रहिवासी असलेल्या दुर्गेश विजय निंबाळकर याला दुचाकी क्रमांक एम. एच.३०-के-९८८२ वरून१९२देशी दारूचे क्वॉर्टर नेत असतांना अटक करण्यात आली. त्याच्या कडून दुचाकी सहित४९हजार७२०रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तीनही आरोपींविरोधात खदान, रामदास पेठ,आणि अकोट फाईल पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा६५(ई)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून,१६ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत १लाख१७हजार३०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने केली.

..