अकोला

शनिवार- रविवारी भरतपूर येथे विसावी अ.भा. बौध्द धम्म परिषद!

माझोड : भरतपूर येथील तथागत सदधम्म बहुउद्देशीय प्रशिक्षण मंडळाचे वतीने विसाव्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे.

शनिवार दि.२५ व रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी ही दोन दिवसीय धम्म परिषद होणार आहे. धम्म परिषदेला देश विदेशातील गाढे अभ्यासक भदंत मार्गदर्शन करणार आहेत.

यामध्ये धम्मसेवकजी महास्थवीर मुळावा,पूज्य भदंत प्रा.खेमधममो उमरखेड, भन्ते ज्ञानज्योती चंद्रपूर, भदंत धम्मपाल हिंगणी, बी. संघपाल अध्यक्ष भिखु संघ अकोला जिल्हा, भन्ते विणयपाल बुलढाणा, औरंगाबाद येथील भन्ते ज्ञानरक्षीत, भन्ते करुणानंद, भन्ते धम्मानंद,भन्ते धम्मबोधी, भन्ते अमृतानंद, उत्तरप्रदेश मधील धम्ममेघा आर्याजी, सुमेधबोधी वटफडी, भन्ते बुद्धपाल काटेपूर्णा, भन्ते सुमंगल शिवणी,भन्ते सुनितंबोधी येवता,भन्ते श्रद्धानंद,भन्ते धम्मशील भरतपूर, भन्ते संजीव, आदींसह इतर मान्यवर भदन्त उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तेव्हा माणूस म्हणून जगण्याची इच्छा असलेल्या राज्यातील नागरिकांनी या धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तथागत बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष भास्करराव खंडारे, सचिव जयंत खंडारे, नाजूकराव खंडारे, सुमेध खंडारे आदींसमवेत मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.