महाराष्ट्र

व्यायाम करणाऱ्यांनाही हृदयविकाराचा झटका का येतो?, समजून घ्या ही अत्यंत महत्त्वाची कारणं

मुंबई२सप्टेंबर:-बॉलिवूड मधील सर्वच कलाकार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने भरपूर काळजी,  आरोग्यदायी आहार घेणं या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देतात. त्यासोबतच ते अनेक तास जीममध्ये घालवतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त आणि सहनशक्तीपेक्षा जास्त व्यायम करणं जीवाला धोकादायक ठरु शकतं. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने सर्वांना सुन्न केलं आहे. तोही आपल्या आकर्षक बॉडीफिटनेससाठी जिम करायचा.सिद्धार्थ शुक्ला फिटनेस फ्रिक असून त्याची तब्येत देखील नेहमीच हेल्दी आणि मेंटेन असायची, असं असून देखील सिद्धार्थचा अचानक मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे सिद्धार्थचा मृत्यू ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सिद्धार्थने देखील जास्त प्रमाणात व्यायम केला आहे का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नियमित व्यायाम तब्येतीसाठी चांगला असला तरी काही व्यायाम ह्रदय विकाराचा धोका ठरु शकतात, असं अभ्यासातून समोर आलं आहे.प्रत्येकाने आपल्या शारीरिक शमतेनुसार व्यायम करणं महत्त्वाचं आहे. शरीरासाठी प्रत्येकाने दररोज 30 मिनिटं मध्यम ते तीव्रतेचा व्यायाम करावा. मात्र शरीर शमतेपेक्षा जास्त व्यायाम करु नये. असं केल्यास ह्रदयाला धोकादायक ठरु शकते. तसेच काहींना जास्त व्यायाम सहन न झाल्यास ह्रदय विकाराचा झटका देखील येऊ शकतो.दरम्यान, अवघ्या 40 वर्षाचा सिद्धार्थ अचानक मृत्युने लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच त्याचा मृत्यू ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे झाला असल्याची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र सिद्धार्थचे निधन नक्की कोणत्या कारणामुळे झाला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेन अहवालातून समोर येईल