लेख

विशेष लेख : चला आता तरी एक व्हा रे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणार्‍या अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, परंतु हजारो संघटना हजारो नेते यामुळे समाजाची ताकद विभागली गेलेली आहे. लोकशाहीमध्ये सामाजिक संघटना व राजकीय पक्ष असायलाच पाहिजेत. सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्ष हे लोकशाही मार्गाने सरकारवर दबाव आणून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात.

म्हणजेच कोणत्याही सामाजिक संघटना अथवा पक्ष हे समाजाचे अस्तित्व निर्माण करून समाजाचे एक स्थान निर्माण करत असतात. परंतु हजारो संघटनेमुळे समाजाचे वजन व स्थान हे कमकुवत झालेले दिसत आहे.

याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे समाजाची शक्ती सामाजिक संघटनेच्या नावाखाली राजकीय पक्षांच्या नावाखाली विखुरली गेलेली आहे. जेव्हा शक्ती विखुरली जाते तेव्हा त्या समाजाचे वजन आपोआपच कमी होत असते आणि ज्या समाजाचे वजन कमी झालेले असते, त्या समाजाला न्याय हक्क न मिळता सामाजिक समस्याला सामोरे जावे लागते. आणि आज तीच परिस्थिती आंबेडकरवादी समाजाची झालेली आहे. हजारो नेते हजारो संघटना असल्या तरीही समाजाला न्याय मिळत नाही. संविधान व बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा संविधानाची अंमलबजावणी व बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित व्यवस्था या ठिकाणी राहिली नाही. याला जबाबदार कोणाला धरायचे ?

माझी संघटना राजकीय पक्ष एकमेकांवर टीकाटिपणी करून तोंड सुख घेतल्यापेक्षा समाजाची शक्ती विघटित दाखवल्यापेक्षा जर आपण सामाजिक समस्येवरती स्वतःच्या संघटनेचे अस्तित्व कायम ठेवून एका बॅनरखाली जर एकत्र झालो, तर आपण सामाजिक न्याय व हक्क अधिकार समाजाला मिळवून देऊ शकतो. आज देशाची परिस्थिती बघितली तर देश हुकूमशाही कडे वाटचाल करताना दिसत आहे मग स्वतःला लोकशाहीवादी समजणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणारे लोकशाही वाचवण्यासाठी समाजाला न्याय देण्यासाठी जर एकत्र येत नसतील तर यांचेही कार्य प्रस्थापित हुकूमशाहीला पोषक असणार आहे.

थोडक्यात काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांचे नाव घेऊन मनुवाद्यांचे हात बळकट करण्याचे काम आपण करत आहोत. प्रत्येक सामाजिक संघटनेला प्रत्येक नेत्याला असंच वाटते माझे नाव माझे संघटना हे खूप मोठे आहे आज समाजामध्ये एक जरी मोठी संघटना असती एका संघटने जरी मन लावून समाजाचे कार्य केले असते तर सामाजिक समस्या निर्माण झाल्या नसत्या. सरकारवर दबाव वाढून हुकूमशाही कडे वाटचाल केली नसती. ज्या बाबासाहेबांनी वैयक्तिक जीवनाची पर्वा न करता देशांमध्ये लोकशाही दिली त्याच बाबासाहेबांच्या देशांमध्ये सत्तर वर्षांमध्ये लोकशाही ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत होती परंतु लोकशाहीचे झाड मोठे दिसत असले तरीही लोकशाहीचे मूळ मात्र अजूनही खोलवर पोहोचली नाहीत. आणि हे मुळे खोलवर पोहोचवण्यासाठी मुख्य जबाबदारी होती ती सामाजिक संघटनेची. परंतु सामाजिक संघटनेकडून सुद्धा हे काम झालेले दिसत नाही उलट लोकशाहीचा गैरवापर करून व संविधानाचे नाव घेऊन मलाही अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे मलाही संघटना निर्माण करण्याचा अधिकार आहे असे बोलून समाजामध्ये हजारो संघटना निर्माण केल्यात.

एवढ्या संघटना एवढे नेतृत्व निर्माण होऊनही जर लोकशाहीचे मुळे समाजापर्यंत पोहोचली नसतील तर एवढ्या संघटना आणि नेत्यांचा समाजाला काय फायदा? आज देशामध्ये शिक्षण आरोग्य बेरोजगारी महागाई या मुख्य समस्या वाढलेले आहेत. उलट पक्षी मोफत शिक्षण रोजगार आरोग्याच्या सुविधा आणि महागाईवर नियंत्रण हे सरकारचे कामे संविधानिक आहेत सरकार संविधानिक कामे न करता इतर कामावर ते लक्ष देऊन उद्योगपतींना हाताशी घेऊन देशाची संपत्ती उद्योगपतींच्या हाती देत आहे आणि आम्ही स्वतःला लोकशाहीवादी समजणारे लोक लोकांनाच सामाजिक समस्या मध्ये ढकलत आहोत. हीच खूप मोठी शोकांतिका आहे आम्ही जर बेकीने लढलो तर आम्हाला कधीही न्याय मिळणार नाही. पण पद प्रसिद्धी पैसा याचा विचार न करता केवळ एक भारतीय नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी म्हणून,आणि लोकशाहीचा लाभार्थी म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी जर आपण एकत्र आलो तर मात्र आपण आपली एक ताकद नक्की निर्माण करू शकू.

आज बघितले तर देशामध्ये विरोधी पक्ष जवळपास संपुष्टात आलेला आहे लोकशाहीमध्ये केवळ विरोधी पक्ष नव्हे तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक असतो. परंतु देशाची हुकूमशाही कडे वाटचाल आणि त्यातही विरोधी पक्ष नसणे हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लोकशाहीमध्ये दबाव गटाला खूप महत्त्व असते परंतु शक्ती विखुरल्या गेल्यामुळे दबाव गट सुद्धा या ठिकाणी सक्रिय कार्यरत नाहीयेत एकेका नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एकेका ठिकाणी आवाज उठवण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन एकत्र आवाज उठवला तर लोकशाहीचे संरक्षण नक्की होईल.

परंतु त्यासाठी गरज आहे स्वतःची संघटना स्वतःच पद प्रसिद्धी आणि पैसा या गोष्टी काही अंशी का होईना बाजूला ठेवणे. असेच आपण केले तर आपल्या मागण्या सरकारकडे मांडून त्या पूर्ण करून घेऊ शकतो. शिक्षण बंद होत आहे नोव्ाâरी बंद झालेली आहे निवृत्त लोकांना पेन्शन नाही अस असताना सुद्धा आम्ही लोकशाहीवादी आहोत असे म्हणणे कितपत योग्य ठरेल बरेच स्वतःला आंबेडकरवादी समजणारे लोकशाही वर विश्वास असणारे लोक सत्ताधारी लोकांना मिळतात स्वाभिमान गहाण टाकून लाचारीचे दोन पैसे घेऊन समाजाचा त्याठिकाणी लिलाव करतात.

अशा लोकांकडून संविधानाचे रक्षण आणि लोकशाहीचे मूळ ते समाजामध्ये रुजवण्यास कधी संमत होणार नाही. थोडी तरी सामाजिक जाणीव ठेवून सर्वांनी एक होणे ही काळाची गरज आहे आज जर आपण काळाची परिस्थिती ओळखून जर एक झालो नाही तर येणारा का हा गुलामगिरीकडे नेणाराच असेल पैशाच्या जोरावर या ठिकाणी राजकारण केले जात आहे. जिथे राजकारण विकासाच्या नावावर व्हायला पाहिजेत ती जागा पैसा आणि जातीने धर्माने घेतलेली आहे. अशा ठिकाणी माणसाची लोकशाही रुजवणे अशक्य आहे आणि म्हणून अनेक षडयंत्र लोकशाही नष्ट करण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि स्वतःला आंबेडकरवादी समजणारे लोक विभक्त होऊन काही ठिकाणी आमिशांना बळी पडून हे शत्रूंच्या गोठ्यात गेलेले आहेत. परंतु बांधवांनो आजही आपण जर एक झालोत आणि लोकशाही टिकवण्यासाठी जर आवाज उठवला तर आपण लोकशाहीचे संरक्षण करू शकतो. परंतु त्यासाठी गरज आहे ती एकत्र येण्याची एकत्र लढण्याची एकत्र आवाज उठवण्याची.ईव्हीएम च्या माध्यमातून मताचा अधिकार हा काढून घेतलेला आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रिया फक्त नामात्र झालेली आहे.

ईव्हीएम मध्ये गडबडी करून सत्ताधारी सत्तेवर येत आहेत आणि सत्तेवर आल्यानंतर ते लोकशाही विरुद्ध कृत्य करत आहेत हे जर थांबवायचं असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे सर्वांनी एकत्र येणे। मुंबई या ठिकाणी गेल्या २३ दिवसापासून संशोधक विद्यार्थी आपल्या स्वतःच्या फेलोसिफ साठी आंदोलन करत आहेत. परंतु हजारो संघटना हजारो नेते राजकीय पक्ष एवढे असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना आंदोलनाची गरज पडते, आणि २३ दिवस होऊनही सरकार जर त्यांची दखल घेत नसेल तर, हे सरकार सर्वसामान्य लोकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराचे आणि संविधान मानणारे नाही हेच सिद्ध होते. तसेच आपल्या बेकी मुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाहीये की मला त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण एकत्र येऊन जर आपली ताकद दाखवली तर समाजामध्ये एक अशी एक किरण निर्माण होईल आणि सरकारवर दबाव येईल ही वेळ आता बेकीने लढण्याची नसून एकीने लढण्याची आहे याची जाणीव प्रत्येकाला व्हावी आणि लोकशाहीसाठी संविधानासाठी आपण एकत्र यावे ही नैतिक जबाबदारी प्रत्येक राजकीय संघटना पक्ष यांनी लक्षात घेऊन एक येण्यासाठी समोर यावे. आपण जर समोर आलो नाही तर लोकशाहीचा अंत आणि पुन्हा गुलामगिरी हे निश्चित.

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान रा. आरेगाव ता. मेहकर मोबा: ९१३०९७९३००