लेख

विशेष लेख : कर्मचार्‍यांवर जनतेचा रोष का?

जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सरकारी कर्मचारी वर्ग आंदोलन करत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे लोकशाही मजबूत असल्याचे चिन्ह आहे. आजपर्यंत अनेक आंदोलने वेगवेगळ्या मागण्यांसाठी देशांमध्ये झालेले आहेत. आणि आंदोलनाच्या माध्यमातून अनेक न्याय सुद्धा मिळालेले आहेत. परंतु जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून कर्मचारी आंदोलन करत असताना जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. आणि कदाचित एखाद्या आंदोलनाविषयी सर्वसामान्यांचा असा रोष व्यक्त होण्याची ही पहिलीच घटना असावी.

आंदोलनाला विरोध होतो असं नाही आज पर्यंत एखाद्या आंदोलनाला विरोध झालाच तर एखादी संघटना आंदोलन करणारी असायची, आणि एखादी संघटना त्याला विरोध करणारी किंवा सदर आंदोलन चुकीचे आहे असं मानणारे असायची. परंतु जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी कर्मचार्‍यांनी जे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला सर्वसामान्य लोकांनी जात, धर्म, पक्ष, संघटना या कोणत्याही बाबीचा विचार न करता केवळ आणि केवळ कर्मचारी करत असलेली मागणी सरकार मान्य करेल की नाही हे माहिती नाही, परंतु सर्वसामान्य लोकांनी ती अमान्य तर केलीच, परंतु प्रचंड रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे. कर्मचार्‍यांचे आंदोलन हे कर्मचार्‍यांचे बंद केलेले पेन्शन लागू करण्यासाठी सरकार विरोधात आहे. सरकार विरोधात असलेले हे आंदोलन जनता का नाकारत असेल बरं?

फक्त नाकारत नाहीये तर त्यांच्या भावनेचा जर विचार केला तर जनतेच्या मनामध्ये कर्मचार्‍यांविषयी फक्त नाराजीच नाही तर राग सुद्धा आहे. कोणत्याही आंदोलनावर आजपर्यंत अशा शब्दात टीकाटिप्पणी झाली नसेल अशा शब्दात टीकाटिप्पणी या आंदोलनावरती होत आहे. आंदोलकांना भ्रष्टाचारी काम चुकार समाजाची जाणीव नसलेले कर्तव्याची जाणीव नसलेले लाचखोर म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. सदरची परिस्थिती बघता ज्यांना सामान्य माणसांमध्ये सरकारी कर्मचार्‍यांविषयी आदर आपुलकी दिसून येत नाही ही परिस्थिती कशी निर्माण झाली? याला जबाबदार कोण? यावर सरकारी कर्मचारी चिंतन मननं करतील काय? सरकारी कर्मचारी लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत जनतेचा आवाज मनापासून निघत असल्याचे दिसत आहे.

परंतु जनतेचे हे मत खोटे आहे हे सरकारी कर्मचारी सिद्ध करणार का? जनतेने केलेल्या आरोपाचा डाग घेऊनच सरकारी कर्मचारी जगणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सरकारी कर्मचारी असतात परंतु येथे कर्मचार्‍यांवरती जनतेचा विश्वासच नसेल तर हा विश्वास संपादन करण्यासाठी सरकारी कर्मचारी यानंतर भूमिका घेतील का? सर्वसामान्य जनतेचा रोष जनतेचे मते बघितले असं वाटतंय सर्वसामान्य जनतेला कर्मचार्‍यांनी खूप त्रास दिलेला आहे. लाचेच्या नावाखाली संपत्ती कमावलेली आहे आणि याच गोष्टी जनतेच्या तोंडून बाहेर पडत आहेत.

सरकारी कर्मचारी हे जनसेवक असतात आणि जनसेवकाविरुद्ध एका मताने सर्व जनता विरोधात जात असेल तर ही परिस्थिती देशासाठी, समाजासाठी खूप घातक आहे.सरकारी कर्मचारी सामाजिक कार्य तर सोडा त्यांचीच जबाबदारी जबाबदारीने पार पाडत नाहीत, वेळेवर हजर न राहणे, जनतेशी आपुलकीने न बोलणे, असे कर्मचार्‍यांचे वर्तन असते मग काम चुकारपणा करायचा, वेळेवरती काम करायचे नाही, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरायचे असे अनेक प्रश्न असताना कर्मचार्‍यांना पेन्शन नेमके कोणत्या कामासाठी द्यायचे हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. आता हा भाग झाला जनतेच्या मताचा परंतु जनतेचे मत खोडून काढण्यासाठी सरकारी कर्मचारी काय भूमिका घेतात हे बघणे सुद्धा गरजेचे आहे जर सर्वसामान्य लोकांच्या या प्रश्नाला कर्मचार्‍यांनी उत्तर दिले नाही तर ते भ्रष्ट काम चुकार लाचखोर आहेत हेच सिद्ध होईल, सर्वसामान्य जनतेची जनभावना लक्षात घेऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे किंवा पेन्शनला सर्वसामान्य लोक विरोध का करतात या बाबीचे चिंतन करणे व सरकारी कर्मचार्‍यांना आवश्यक आहे.

जर या गोष्टीवर त्यांनी चिंतन केले नाही तर सरसकट कर्मचारी हे लाचखोर भ्रष्टाचारी व कामचुकार असल्याचे जाहीर होईल परंतु सर्वसामान्य लोकांचा एवढा राग निर्माण होईपर्यंत जबाबदारी आणि पातळी सोडून काम करणे हे सरकारी कर्मचार्‍यांना शोभनीय नाही. सरकारी कर्मचार्‍यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन हा खूप आदरपूर्वक व बौद्धिक असतो पण या जुनी पेन्शन योजना आंदोलनाच्या माध्यमातून जनता कर्मचार्‍यांना एक तर बुद्धिमान समजत नाही, आणि आदर तर कुठेच दिसत नाही. सरकारी कर्मचार्‍यांनी स्वतःचे महत्त्व स्वतःचा अभिमान स्वाभिमान स्वतःच्या हातानेच कमी केल्याचे चित्र दिसत आहे.

सामाजिक समस्ये वरती सामाजिक कार्यावरती किंवा समाजातील दुर्बल घटकांना मदत न करता कर्मचारी स्वार्थी वृत्तेने स्वतःचा फायदा बघतात. आणि सर्वसामान्य जनतेने मांडलेल्या समस्येवर लवकर तोडगा मिळत नाही त्यांच्या समस्येला महत्त्व दिले जात नाही, सरकार दरबारी सर्वसामान्य जनतेचा सन्मान होत नाही अशी वागणूक कर्मचार्‍यांकडून जनतेला मिळत असेल तर सहाजिकच आहे, जनता ही कर्मचार्‍यांच्या विरोधात जाणार. सर्व सामान्य जनतेकडून लाच घेताना सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु सर्वच कर्मचारी भ्रष्ट लाचखोर व कामचुकार आहेत का कारण सरसकट कोणावरही आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही.

pension-promotion

पण या प्रकरणांमध्ये सरसकट कर्मचारी लाचखोर आणि कामचुकार नसले तरीही, भ्रष्ट काम चुकार आणि लाचखोर कर्मचार्‍यांविषयी हे कर्मचारी बोलले नाही. म्हणजेच भ्रष्ट कामचुकार आणि लाचखोर कर्मचार्‍यांना यांची मुख समिती होती असेच दिसून येते. एकदा सरकारी नोकरी मिळाली की स्वतःला विद्वान समजून इतरांना तुच्छ अडाणी समजून त्यांच्याकडे सरकारी कर्मचार्‍यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असतो, परंतु शासकीय नोकरी नसणे हा गुन्हा तर नाही ना? थोडक्यात सरकारी नोकरदारांनी नोकरी लागल्यानंतर समाजाची व परिस्थितीची जाणीव न ठेवता एक आपला स्वतंत्र परिघ निर्माण करून परिघांमध्येच जगायला लागलीत आणि म्हणूनच सर्वसामान्य जनतेपासून त्यांची आपुलकीची नाळ तुटली की काय असेच दिसून आले.

शेतकरी समस्या विद्यार्थी समस्या महागाई विरोधात न बोलणारे किंवा या विरोधात बोलणार्‍यांना सहकार्य न करणारे वैयक्तिक फायद्यासाठी कोणत्याही परिणामांचा विचार न करता एकत्र येत आहेत, ही गोष्ट जनतेला आश्चर्य करून सोडणारी आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी कर्मचारी आणि फक्त स्वतःचा फायदा बघतो जनतेचा कोणताही विचार करत नाही. म्हणूनच जनतेचा रोष हा सरकारी कर्मचारी वर्गाने विरुद्ध वाढलेला आहे.

हा रोष कमी करण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांनी सर्वसामान्य लोकांसोबत आदराने प्रेमाने राहून कोणत्याही प्रकारची लाच न घेता, जनतेच्या पैशाची हेराफेरी न करता, वेळेवरती कामे करणे हा एकमेव उपाय आहे. आणि या आंदोलनाला होत असलेला विरोध पाहून ही गोष्ट सरकारी कर्मचार्‍यांच्या लक्षात येईल ही अपेक्षा. सदर आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे ते खरोखर समाजामध्ये आदर निर्माण करू शकले नाही. सरकारी नोकरीचा गर्व करून समाजातील लोकांसोबत योग्य व्यवहार केला नाही. म्हणून आज समाजातील लोकांनी त्यांच्या मनातील सरकारी नोकरदारांना विषयी असलेला आदर भाव आणि आपुलकी आंदोलनाला विरोध करतांना जी काही भाषा वापरली त्यातून दाखवून दिलेला आहे.

म्हणून शासकीय नोकरीचा गर्व न करता सर्वसामान्य लोकांना, समजला, आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत असे न समजता आपण समाजाचा घटक आहोत आणि याच घटकांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, हे डोळ्यासमोर ठेवून काम जर केले तर येणार्‍या काळात सरकारी कर्मचारी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आदर, आपुलकी व प्रेम निर्माण करू शकतील. नाहीतर भ्रष्ट, लाचखोर आणि कामचुकार मिळालेली ओळख कायम राहील.

-विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान रा. आरेगांव
ता. मेहकर मोबा: ९१३०९७९३००