अकोला

विविध ग्राम पंचायत येथे अनुसूचित जाती जमाती योजनांची लोककलेद्वारे जनजागृती

अकोट : अकोट तालुक्यात जिल्हा माहिती कार्यालय अकोला व श्री गुरुदेव सांस्कृतिक कलापथक मंडळ अकोट यांच्यावतीने अकोट तालुक्यातीलविविध ग्राम पंचायत येथे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपायोजना २०२२/२३ अंतर्गत विविध योजनांची माहिती गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोककला व शहरी कलापथकाद्वारे लोक जागृती केली यावेळी अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांना भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती पुनर्वसन योजना दिव्यांगांना विविध योजना कन्यादान आणि आंतरजातीय प्रोत्साहन शिक्षण आरोग्य उपजीविका प्रशिक्षण व्यसनमुक्ती व इतर योजनांची माहिती लोककला शहरी पथकातून मुंडगाव, वडाळी सटवाई, वडाळी देशमुख, वरुर जऊळका, मोहाळा, चंडिकापूर व बस स्टॅन्ड अकोट येथे लोक कलावंत शाहीर विजय पांडे व त्यांच्या कलावंतांनी शाहिरीचा गीतांचा तसेच विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन करत सादर केले.

शासकीय पुरस्कृत शाहीर विजय पांडे लिखित पोवाडे सादर केले कला पथकातील दिव्यांग नशीबराव घुसेकर, दिव्यांग विलास नेमाडे, गोपाल आढाव, ढोलकी प्रकाश इंगळे, टाळकरी कैलास निंबोकार, स ग वानखंडे, कैलास मोरे , तबलावादक अभय पांडे यांनी शाहीरी कलापथकाद्वारे जनजागृती करून सादर केले, यावेळी गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील शाळांचे मुख्याध्यापक व गावातील इतर मान्यवर महिला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.