राजकीय

विधान परिषदेत एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे गटनेते..भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न !

मुंबई (प्रतिनिधी ): विधानपरिषदेतील राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. खडसे यांची नियुक्ती करून राष्ट्रवादीने एक प्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देत खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले आहे. भाजप विरुद्ध खडसे असा संघर्ष अनेकवेळा पहावयास मिळालेला आहे. आता खडसे गटनेता झाल्याने सभागृहात हा संघर्ष दिसून येणार आहे. यापूर्वी खडसे यांनी विरोधी पक्षनेता, महसुल मंत्री म्हणून काम केले आहे.खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे.त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर गटनेते पदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पक्षाच्या प्रतोद म्हणून अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केल्याची घोषणाही उपसभापती गोऱ्हे यांनी केली.
****