अर्थ

विदर्भातील अकोला जिल्यातील पहिले स्टार्टअप अकोटात

अकोला: विदर्भातील अकोला जिल्यातील पहिले स्टार्टअप काँनकिल्व्ह अकोट येथे ११ मार्च रोजी झुनझुनवाला हॉल मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरूवात करण्यात आली.

यावेळी सत्राच्या पहिल्या कार्यशाळेत प्रास्ताविक मध्ये बोलतांना लोकजागर मंच संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे हे बोलत होते त्यांनी आपल्या प्रास्तविक मध्ये सांगितले की शेतकरी नुसता शेतातील मंजूर न रहाता तो एक यशस्वी उद्योजक होणे सुद्धा गरजेचे आहे त्यामुळे माझे स्वप्नं आहे की माझा शेतकरी हा उद्योजक होऊन आपल्या पायावर उभा रहाला पाहिजे तर मी माझ्या लोकजागर मंच च्या वतीने आता पर्यंत १५० ते २०० विविध कार्यक्रम राबवून शेतकरी यांना मार्गदर्शन केले आहे.

त्यामुळे स्टार्टअप अतंर्गत त्यांच्या पंखांना बळ मिळेल अकोट विभागातील सर्वात जास्त सोयाबीन, कपाशी तूर,आदी प्रमुख पीके घेतल्या जातात त्यामुळे शेतकरी पिके काढून विकतो मात्र त्यावर जर करून टेक्नॉलॉजी जोड देऊन पुढील पिकांवर उत्पन्न घेता आले तर अकोला जिल्हा सुद्धा स्टार्टअप मध्ये पुढे जाऊ शकतो तर विदर्भातील पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगांव मध्ये बाहेरील व्यापारी आपली विविध स्टॉल लावून मोठे उत्पन्न काढतात मात्र लोणावळा मध्ये गुडपट्टी ही चिकि म्हणून अधिक भावाने विकल्या जाते तर आपल्याकडे गुडपट्टी, केळी चिप्स, विविध बचत गटांच्या माध्यमातून केलेली उत्पादन विक्री साठी उपलब्ध होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात दर ४० किलोमीटर अंतरावर खाद्य पदार्थ बदल आहेत.

त्यामुळे भविष्यात जर यावर काही करता आले तर आपल्या भागांतील अनेक महिला पुरुष नवनवीन उद्योजक यांना मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल असे त्यांनी आपल्या सांगितले.

त्यानंतर विशेष अतिथी म्हणून आलेले प्रमोद चंचुवार मुंबई यांनी सांगितले की,मी अनिल गावंडे यांना खूप जवळून पाहले आहे त्यांना आपल्या गावासाठी भागासाठी काहीतरी नवनविन करण्याची उमेद आहे त्यामुळे विदर्भातील अनुशेष खास करून वर्‍हाडतील अनुशेष भरून काढण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने अनिल गावंडे त्यांच्या वर लक्ष केंद्रित करून त्यांना राजकीय जिवनात सुद्धा यश प्राप्त करून देण्यासाठी त्याच्या सोबत स्टार्टअप करणे गरजेचे आहे.

त्यामुळे एवढा मोठा दूरदृष्टी असलेला व्यक्ती तुमच्याकडे असतांना आपण मागे राहता कामे नये असे त्यांनी उपस्थिताना सांगितले तर आमदारच नव्हे तर मुख्यमंत्री चे गुण सुद्धा अनिल गावं डे मध्ये आहेत हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केले.अजिंक्य कोतावर हे महाराष्ट्र चे राज्यपाल यांचे मार्गदर्शन टीम मध्ये कार्यरत राहलेलं आहे .

त्यांनी स्टार्टअप कॉन किल्व्ह मध्ये उपस्थिताना सांगितले की मी २०२० ला पदमश्री साठी नामांकित झालो आहे त्यामुळे माझ्या नावाने ३५ पेटंट रजिस्टर आहेत त्यामुळे मी पहिला असा महाराष्ट्र व्यक्ती आहे माझ्या कडे शेती नाही तरी मी शेतीसाठी गेली १० वर्षांपासून काम करतोय आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे आपल्याकडे युवकांनी शेतीकडे वडणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे शेतीला दुय्यम स्थान दिले आहे.

इजराईल हा देश शेती करणे अयोग्य आहे मात्र त्याचे शेतीउपयुक्त औजारे सम्पूर्ण जगात उपलब्ध केली आहे त्यामुळे आपण गटशेती करून सर्वांगीण विकास करता येतो त्यामुळे आपण त्या दिशेने विचार करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा यशस्वीपणे स्टार्टअप करू शकतात डक्स लेझीस च्या रिचा पांडे,सह आंतरराष्ट्रीय उद्योजक यांनी अमेरिकाचे डेक्स लेझीस चे आय पी एल एल सी पा एस जोलो तर दुबई वरून मंन्ट्रो एड्रीहोक्स चे सी ई ओ शरवाद हसन आदी देशातील उद्योजक यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.