umesh-bhakre
क्रीडा

विदर्भश्री शरीर सौष्ठव स्पर्धा; अकोल्याचाउमेश भाकरे ठरला ‘ विदर्भ श्री’ चा मानकरी

अकोला: विदर्भश्री, शरीर सौष्ठव स्पर्धेत अकोल्याचा उमेश भाकरे विदर्भ श्री चा मानकरी ठरला. विदर्भ श्री शरीरसौष्टव स्पर्धा कौलखेड येथील प्रांगणात झाली. विदर्भातील बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील युवकांना संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने ही स्पधा आयोजित करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये विदर्भातून शंभर पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी क्रीडा राज्य मंत्री गुलाबराव गावंडे होते. उदघाटन शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केले.

प्रमुख पाहूणे म्हणून राकाँचे प्रदेश? उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे , माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, प्रा. विश्वनाथ कांबळे व परिसरातील ज्येष्ठ नागरिक तथा शरीर सौष्ठव स्पर्धेचे परीक्षक उपस्थित होते. विजेत्यांचे बक्षीस वितरण डॉ. संजय? मोरे, डॉ.अमोल रावणकर ,माजी नगरसेवक पंकज गावंडे, जिल्हा महासचिव आनंद वानखडे, शिवसेनेचे अकोला पूर्वचे प्रमुख राहुल काराळे,करण दौड, अरुण कडू यांच्या हस्ते करण्यात आले.