वाशिम दि.१८:(क्रीडा प्रतिनिधी)
दि.१४ ते १९ आँगष्ट २०२१ या कालावधीमध्ये अहमदाबाद (गुजरात) येथे प्री-नॅशनल शूटींग स्पर्धा पार पडली,या स्पर्ध्ये मध्ये रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडू सहभागी झाले होते, त्या पैकी रायफल शूटिंग स्पर्धेत मुलांपैकी क्षितिज कैलास राऊत याने ४०० पैकी ३८१ गुण घेतले ,अरहंत अरविंद घुगे याने ४०० पैकी ३७० गुण घेतले,तर रुषभ अजय ढवळे यानेही ४०० पैकी ३७० गुण घेतले अशा या तीन शूटरची प्रि- नँशनल रायफल शूटिंग स्पर्धेतून राष्ट्रिय स्पर्ध्येकरीता निवड झाली आहे,वाशिम जिल्ह्यात प्रथमच ३ खेळाडू प्री-नॅशनल शूटींग स्पर्धेत सहभागी होऊन त्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल दि.१७ ऑगस्ट रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी प्रशिक्षक प्रल्हाद आळणे,क्षितिज राऊत,अरहंत घुगे,रुषभ ढवळे,यांचा रफिक मामु,महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पुरुषोत्त चव्हाण,म.पो.महेश आकरे,शिक्षक अरविंद घुगे,सह प्रशिक्षक अनुप मानतकर,पत्रकार अजय ढवळे,जिम कोच सागर आळणे, यांनी पुष्पहार घालून खेळाडूचा सत्कार केला,यावेळी कु.सोनल चव्हाण, कु.जानव्ही मानतकर,कु.मृणाली आकरे उपस्थित होत्या,या विद्यार्थ्यांच्या निवडीचे वाशिम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे,या सर्व खेळाडूंना येणाऱ्या पुढील स्पर्धे करीता तसेच पुढील वाटचालीस वाशिम जिल्हावासियांनी तसेच वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शंकरलाल हेडा, वाशिम रायफल क्लबचे अध्यक्ष तथा जेष्ठ क्रीडापट्टू रफीक खान, हाजी खान ( मामू ) तसेच उपाध्यक्षा आशाबाई गंगाधर शिवणकर व वाशिम रायफल असोसिएशनच्या व वाशिम रायफल क्लबच्या सचिव निशा गंगाधर शिवणकर, सहसचिव सागर संजय निवलकर, कोषाध्यक्ष महादेव नारायण तूर्के, सदस्य विद्याधर नानाजी मानतकर, प्रज्ञा महादेव तुर्के, संतोष आत्माराम आळणे, वैशाली संजय निवलकर, सागर रमेश आळणे, सचिन रमेश आळणे या सर्वांनी तसेच सर्व खेळाडूंच्या पालकवर्गानी शुभेच्छा दिल्या आहेत, असे प्रशिक्षक प्रल्हाद आळणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.