washim-jain-fight
वाशिम

वाशिममध्ये दिगंबर आणि श्वेतांबर एकमेकांना भिडले, भगवान पार्श्वनाथांच्या मूर्ती लेपनावरुन फ्री स्टाईल हाणामारा

वाशिम: कधी लाथा तर कधी बुक्क्या, कधी पायताण तर कधी खुर्च्या… हे सगळं सुरु आहे ते जगाला शांततेचा संदेश देणार्‍या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरासमोर. वाशिममधील तब्बल ४२ वर्षांनतर उघडलेल्या मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या लेपनावरुन वाद झाला आणि त्या नंतर दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन पंथिय एकमेकांना भिडलेत्याचं झालं असं की वाशिमच्या शिरपूर जैन या गावात भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीवरच्या लेपनावरुन श्वेतांबर आणि दिगंबर पथियांमध्ये वाद सुरु झाला.

श्वेतांबर पंथियांनी लेपनाच्या बहाण्याने मूर्तीचं रुपच बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप दिगंबर पंथियांनी केला. भगावन पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या सुरक्षेसाठी श्वेतांबर पंथियांनी बाऊंसर लावले. वादाला तोंड फुटलं आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. त्यात कुणाची डोकी फुटली तर कुणाची कंबरडी मोडली. अखेर श्वेतांबर पंथियांनी लेपन प्रक्रिया थांबवली दोन्ही पंथीयांमध्ये १२५ वर्षांपासून मूर्ती हक्कावरून वाद सुरु आहे. याच वादातून मंदिराला अखेर कुलुप लागलं. त्यानंतर ४२ वर्षानंतर मंदिराचं दार उघडलं.

दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचं आणि मूर्तीला लेप करण्याचे कोर्टाने आदेश दिले. ११ मार्च रोजी श्वेतांबर पथांकडे मंदिराच्या चाव्या देण्यात आल्या. पण मूर्तीला लेपनचा अधिकार श्वेताबंर पंथियांना दिला होता. लेपन करण्यासाठी श्वेताबंर पंथियांनी कुलुप लावलं. १४ मार्च रोजी दिगंबर पंथियांनी मंदिराचा दरवाजा उघडून प्रवेश मिळवला. मंदिराचा दरवाजा चुकीच्या पद्धतीने उघडल्याचा आरोप श्वेतांबर पंथियांनी केला. त्यानंतर वाढलेल्या तणावामुळे शनिवारी दिवसभर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आज जुन्याजाणत्यांनी दोन्ही पंथियांमध्ये समेटही घडवली. पण ही अहिंसक वृत्ती जेमतेम तासभर टिकली आणि पुन्हा सुरु झाली फ्री स्टाईल हाणामारी. जैन समाजाच्या यच्चयावत १४ तीर्थंकारांनी अहिंसेची शिकवण देऊनही त्यांचे अनुयायी एकमेकांची डोकी आणि गुडघे फोडणार असतील तर सगळंच व्यर्थ आहे. ले अनेक दशक मंदिराच्या मूर्ती हक्कावरून वाद झाला आणि परिणामी ४२ वर्ष वाया गेले. चुकीच्या पद्धतीने पुन्हा टाळे लावणे योग्य नसून सर्वोच्च न्यायालयाने मंदिर उघडल्याने गावाचा आणि परिसराचा विकास होईल असं वाटलं होतं. दोन्ही पंथीयांने सामोपचाराने मार्ग काढावा आणि जर मार्ग काढता येत नसेल तर प्रशासनाने ताब्यात घेऊन मंदिर दर्शनासाठी नेहमी उघडे करावे अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.