अकोला

वाई(माना) ते मुरंबा रस्त्याच्या दुरूस्तीची ग्रामस्थांची मागणी

मूर्तिजापूर : अत्याधिक दूरवस्था झालेल्या वाई(माना) ते मुरंबा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी वाई(माना) गट ग्रामपंचायतीच्या सदस्या लक्ष्मी अजय वानखडे व ग्रामस्थांनी जिल्हा परीषद बांधकाम उप अभियंत्यास आज दिलेल्या निवेदनातून केली आहे.

हा रस्ता बराच जुना आहे. आता त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याने वाई(माना)चे लहान मोठे विद्यार्थी शिक्षणासाठी सायकलने दररोज दहातोंडा येथील सुनिला राठोड विद्यालयात जातात. त्यांना सायकल चालविणे अशक्य होऊन प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय वाहन धारकांना वाहन चालविणे दुरापास्त होत आहे.

आशा परिस्थितीत अपघाताची शक्यता बळावते. त्यामुळे या रस्त्याचे नव्यने डांबारीकरण अत्यावश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या रस्त्याची पहाणी करा. डांबरीकरण करा. विद्यार्थी व वाहनधारकांसह असंख्य ग्रामस्थांच्या जिवाचा संभाव्य धोका दूर कर, आशी मागणी करणारे हे निवेदन देतांना उपसरपंच अजय वानखडे, लक्ष्मी अजय वानखडे, कुसूम डोंगरदिवे, पद्मा इटीवाले, उषा इंगोले, तायडे, वंदना वर्घट, शोभा गवई, गौतम वर्घट, दीपक ठाकरे, संगीता नेमाडे, अजय वर्घट, राहुल वर्घट, श्रीकृष्ण नेमाडे, दिनकर डोंगरदिवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.