ajit-pawar
ताज्या बातम्या राजकीय

‘वर्षा’वर ४ महिन्याचे खानपानाचे बील २. ३८ कोटी! चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते का? काही कळायला मार्ग नाही – अजित पवार

मुंबई : ”वर्षा बंगल्याचे ४ महिन्याचे खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते, परंतु ४ महिन्यातील बील एवढे कसे. चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते का काही कळायला मार्ग नाही.

करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे फडणवीस सरकार वैयक्तिक चमकोगिरी करीत आहेत” असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल केला.अजित पवार म्हणाले, गेल्या ८ महिन्यात ५० कोटी सरकारने जाहीरातीवर राज्य सरकारने खर्च केला.

मुंबई मनपाकडून माहीती घेतली तर तेथून १७ कोटी रुपये जाहीरातीवर खर्च केला गेला. एकीकडे एसटी कर्मचार्‍यांचे पगार रखडले परंतु, पानभर जाहीराती देवून उधळपट्टी होत आहे.अजित पवार म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली. मला सरकार मदत करणार नसेल. आमच्यासंदर्भात लक्ष देत नसेल तर माझ्याकडे पावत्या आहेत. त्यात अतिशयोक्ती नाही. एक क्लिप आली. त्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था सांगण्यात आली आहे. मी म्हणतो अशा प्रकारे शेतकर्‍यांवर दुर्दैवी प्रसंग यायला नको. आपला कांदा परदेशात जायला हवे. शेतकर्‍यांचा किमान खर्च तरी निघायला हवा.अजित पवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. जितेंद्र आव्हाडांचे कुटुंब, प्रज्ञा सातव यांच्याशी संबंधित प्रकरण, ठाणे मनपा अधकार्‍याची गुंडगिरी, आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर हल्ला असो की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जाते.

संजय राऊतांना ठार मारण्याची सुपारी असो की, एनसीपीच्या कार्यकर्त्याला पोलिस चौकीत मारहाण आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.अजित पवार म्हणाले, रॅली, सभा कसबामध्ये घ्या पण राज्याचेही बघा. राज्य सरकार सुडाच्या भावनेने काम करीत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव, चिन्हाबाबत जनभावना आणि अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

एमपीएससीला सांगायचे ते दिले सोडून ते निवडणूक आयोग निवडणूक आयोगच करीत आहेत. आम्ही बोललो की, सीएम चिडतात. त्यांच्याच तोंडून हे निघत आहेत ना…अजित पवार म्हणाले, वर्षा बंगल्याचे चार महिन्याचे खानपानाचे बील दोन कोटी ३८ लाख रुपये आले. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होते. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते, परंतु चार महिन्यातील बील एवढे कसे. चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते का काही कळायला मार्ग नाही. गेल्या आठ महिन्यात पन्नास कोटी सरकारने जाहीरातीवर खर्च केला.

मुंबई मनपाकडून माहीती घेतली तर तेथून १७ कोटी रुपये जाहीरातीवर खर्च केला गेला.अजित पवार म्हणाले, तुमचे फोटो हसरे ठेवण्यासाठी तुम्ही खर्च करता तोही नियमाप्रमाणे करीत नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो हवा असताना कुणाचेही वाट्टेल ते फोटो लावले जातात. या पद्धतीने यांचे काम चालले. एसटी कर्मचार्‍यांचा पगार होत नाही. पगाराअभावी कर्मचार्‍यांचे कुटुंब उपासमारीचा सामना करतेय. पण एसटीचे कोट्यावधी रुपये खर्चून पानभर जाहीराती देत आहेत. स्वतःचा ठेंभा मिळवित आहेत.अजित पवार म्हणाले, नेत्यांच्या वैयक्तिक चमकोगिरीसाठी करदात्याचा पैसा उधळला जातोय याचा आम्ही निशेध करीत आहोत. शेतकरी म्हणतात आम्हाला मदत मिळाली नाही. पुरवणी मागण्या मंजूर होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला पण शेतकरी म्हणतात की, आमच्यापर्यंत पैसा पोहचला नाही. हे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. यासह अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.