अकोला

वंचितांना भरवला पुरणपोळीचा घास: स्व. अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाऊंडेशनचा उपक्रम

अकोला : दरवर्षी रुढीपरंपरेनुसार होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळीला पुरणपोळी चे विशेष महत्त्व आहे सायंकाळी होळीचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे अशा वेळी आपल्या परिसरातील मोल मजुरी करुन पोट भरणारे परराज्यातील कामगार, दवाखान्यात दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईक भटकंती करणारे कुटुंब त्यांची इच्छा असुनही परीस्थितीमुळे सण साजरा करु शकत नाहीत अशा वंचितांचा मुखी होळी सणाला पुरणपोळी चा घास भरवण्याचा उपक्रम मागील वर्षी पासून आयोजित करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून अथर्व मल्टिपर्पज फाऊंडेशन गोकुळ कॉलनी अकोलाद्वारे या वर्षी होळी ला दिनांक ६/०३/२०२३ सोमवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सरकारी दवाखान्यात दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना पुरण पोळी व तुप वितरण करुन त्यांना होळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला याचा लाभ २०० ते २५० लोकांनी घेतला.

प्रा. अनिल मुळे कुटुंबियांनी त्यांचा मुलगा स्व. अथर्वच्या संशास्यपद आकस्मिक मृत्युच्या दुखातुन सावरत अथर्वच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील वंचितांच्या सेवेकरिता त्यांचे नातेवाईक व स्व. अथर्वच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने स्व. अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था दोन वर्षा पुर्वी स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे सतत वंचित पिडीतांची सेवा करण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने उत्कर्ष ? शिशुगृहातील अनाथ चिमुकल्यांना दरमहा आवश्यक असलेली औषधी पुरवणे, हिवाळ्यात ब्लॅकेट व कानटोपी वितरण, उन्हाळ्यात पाणपोई, पावसाळ्यात छत्री व रेनकोट वितरण, गरजुकरीता मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर, रक्तदान शिबीर, सुर्योदय बालगृह व आनंद आश्रमातील अनाथ मुलामुलींना अंडरगारमेंट व चादरीचे वितरण व अन्नदान, गायत्री बालगृहातील मुलींना पादत्राणे वितरण, दिवाळीत फराळ साड्या, कपडे वाटप, वर्षभर गरजू शालेय विद्यार्थी यांना आवश्यक वह्या पुस्तके पेन वाटप, दरवर्षी सलग पाच दिवस सरकारी जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचेकरीता अन्नदान करण्यात येते व वर्षभर गरजुंना अन्नदान करणे यासह अनेक उपक्रम आयोजीत करुन समाजातील वंचित व गरजू लोकांची सेवा करण्याचा अल्पसा प्रयत्न केला जातो..

या वर्षी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मनोहरराव महल्ले, डॉ. सीमा मुळे, सर्वेश गांधी, अश्विन रामीधामी, प्रणित बावेशी, रौनक अग्रवाल, अभिषेक कोपुल, सुनिलराव मुळे, पांडुरंग राऊत यांचे सह अथर्व फाऊंडेशनच्या सर्व सभासदांनी सहकार्य केले.