अकोला: लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत येणार्या लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन, लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन फेमिना व मातोश्री वृद्धाश्रम अकोला यांचे संयुक्त विद्यमाने ११ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष पीएमजेएफ मुरलीधर उपाध्याय व आयोजन समितीने शहर व ग्रामीण भागातील गरजू जोडप्यांची निवड करून दानदात्यांच्या मदतीने यांचा सामूहिक विवाह करून लॉयन्स परिवाराच्या इतिहासात एक आदर्श प्रस्थापित केला. विवाह समिती मार्फत वधूचे सोन्याचे मंगळस्रूत्र, दोघांचे कपडे व दोघांना नवीन संसार सुरू करण्यासाठी संसारोपयोगी अनेक वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्यात.
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, एरिया एलसीआयएफ लीडर महावीर पाटणी, उपप्रांतपाल प्रथम सुनील देसरडा,डॉ रणजीत पाटील, उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, राकॉ जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,माजी प्रांतपाल रमाकांत खेतान, डिस्ट्रिक्ट पिआरओ मुरलीधर उपाध्याय, रिजन चेअर पर्सन अश्विन बाजोरिया,राहुल आवसेकर, संजय सारडा, झोन चेअरपर्सन मुकेश शर्मा, कार्यक्रम अध्यक्ष अनिता उपाध्याय,मिडटाउन क्लब अध्यक्ष प्रा विवेक गावंडे, फेमिना अध्यक्ष संध्या अग्रवाल, मातोश्री वृद्धाश्रम संचालक युवराज गावंडे, नगरसेवक पंकजभाऊ गावंडे आदी उपस्थित होते. संचालन सत्यपाल बाषानी यांनी व आभार मुरलीधर उपाध्याय यांनी मांनले.
हा विवाह सोहळा सफल करण्यासाठी गिरीश अग्रवाल, महेंद्र खेतान, संतोष अग्रवाल, सुभाषचंद्र चांडक, नवीन खोसला,लोकेश भाला, नितीन जोशी, जितेंद्र जैन, किशोर अग्रवाल, राजेश पूर्वे,संतोष वाधवाणी, राम राठी,लखन राठी, डॉ आशिष डेहनकर, डॉ तिलक चांडक, पियुष संघवी, संदीप पाटील,मंगेश कक्कड, किसन गायकवाड, डॉ सुनंदा केळकर,मातोश्री वृद्धाश्रमच्या मार्गदर्शिका सौ आशाताई गावंडे, सौ स्वातीताई गावंडे, माधुरी शर्मा, कोमल भाला, देवयानी गावंडे, किरण अग्रवाल,विना गोयनका फेमिना ग्रुप यांनी विशेष सहकार्य केले.