ताज्या बातम्या

लस प्रमानपत्रावरचा मोदींचा फोटो, जागरूकता निर्माण करण्यासाठी, खा. केतकरांच्या प्रश्नाला केंद्रीय आरोग्य मंत्री यांचं उत्तर!

नवी दिल्ली11 ऑगस्ट : कोविडं१९च्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर नागरिकांना एक प्रमाणपत्र देण्यात येते, त्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा कशासाठी?असा प्रश्न काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी या संबंधी एक प्रश्न विचारला होता. फोटो हा केवळ व्यापक जनहितासाठी असून तो लसीकरणानंतरही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठीच लावण्यात आला असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी संसदेत सांगितलं.
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकरांनी या संबंधी एक प्रश्न विचारला होता. कोविड१९च्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदींचा फोटो का लावण्यात आला आहे, त्याची आवश्यकता आहे का किंवा ते बंधनकारक करण्यात आलं आहे का आणि यामागे काय कारण आहे असा प्रश्न खासदार कुमार केतकरांनी राज्यसभेत विचारला होता.

कुमार केतकरांच्या या लिखित स्वरुपाच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, “कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो हा व्यापक जनहितासाठीच लावण्यात आला आहे. लस घेतल्यानंतरही लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांबद्दल जागरुकता निर्माण करण्याासाठी हा फोटो लावण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांबद्दल लोकांमध्ये परिणामकारक जागरुकता निर्माण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.”

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पुढे म्हणाल्या की, “आपल्या देशातील कोरोना लसीचे प्रमाणपत्र तयार करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मानदंडांचे पालन करण्यात आलं आहे