संतोष आढाव६नोव्हेंबर:-वाशिम जिल्ह्यातील येत असलेल्या, मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत माझे लग्न का करून देत नाहीत म्हणून मुलाने पित्याची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील जाऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत जाऊळका गावातील प्रमोद धर्मा भारती वैभव वय वर्ष 27 याने दिनांक 05/11/2021 च्या सायंकाळी साडेपाच वाजताची दरम्यान त्याचे वडील धर्मा भारती वय 65 यांच्याशी माझे लग्न का करून देत नाही म्हणून वाद घातला दरम्यान त्याने लोखंडी कुर्हाडीने डोक्यात व पायावर वार करून गंभीर जखमी केले याबाबतची फिर्याद मृतकाचे सून संजीवनी महादेव भारती या महिलेने जऊळका पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी गंभीर जखमी धर्मा यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान धर्मा भारती यांचा रात्री दोन वाजताचे दरम्यान मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे व सहकारी करीत आहेत.