विदर्भ

रेल्वे भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने, माना वासी त्रस्त

मूर्तिजापूर११सप्टेंबर:  मे-२०१९ पासून माना रेल्वे गेट क्रमांक ५५ अ खाली रेल्वे विभागामार्फत भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते सदर काम सुरू केले असता दळणवळण करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून देण्यात आला होता परंतु सदर पर्यायी मार्ग हा सन २०१९ च्या पावसाळ्यात पुर्णतः खराब झाल्याने रहदारीसाठी अनेक अडचणीना सामोरे जावे लागले त्यावेळेस रेल्वे विभागाला खराब झालेल्या रस्त्याबाबत माहिती देऊन त्यावर कुठल्याही प्रकारची उपाय योजना न केल्याने गाववासीयांनी दिनांक १५ ऑगस्ट २०१९ रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता परंतु रेल्वे विभागाने दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी ग्रामपंचायत कार्यालय माना येथे येऊन रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते आश्वासन दिल्याने रेल रोको आंदोलनास स्थगिती देण्यात आली होती रेल्वे विभागाने दिलेले आश्वासन अद्याप पर्यंत पूर्ण न केल्याने माना वासीयांनी रस्त्याबाबत बरेचदा रेल्वे विभागाला व ग्रामपंचायत कार्यालय यांना तक्रारी दिल्या आहेत एकाही तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही होणारा त्रास सुद्धा समजून घेतला नाही तक्रारीचा ग्रामपंचायत कार्यालयाला त्रास सहन न झाल्याने व नागरिकांचे होणारे रस्त्यासाठीचे हाल पहावंल्या जात नसल्याने ग्रामपंचायतचे मासिक सभा दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी ठराव मंजूर करून आमरण उपोषणाला उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे सरपंच ,उपसरपंच ,व सदस्य बसणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सतीश मोखडकर यांनी सांगितले.रेल्वे विभागाचे भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने गेल्या दोन वर्षांपासून माना ग्रामवासी त्रस्तझाले असून,महात्मा गांधी यांच्या जयंती पासून सरपंच ,उपसरपंच सदस्यांसह बसणार आमरण उपोषणाला बसणार आहेत.