क्राईम

रेती(वाळू)ची चोरी करणाऱ्या ३आरोपींसह, तीन वाहने पोलिसांच्या ताब्यात!

अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई!
अकोला प्रतिनिधी३०सप्टेंबर:-शासनाने रेती(वाळू)च्या घाटाचे लिलाव न केल्याने,रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. याचाच फायदा घेत रेती माफियांनी अकोला जिल्ह्यात रेती चोरीचा सपाटा लावला असून,या गोरखधंद्यातून कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने कंबर कसली असून३० सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने चोरट्यामार्गाने रेती(वाळू)ची वाहतूक करणारे तीन वाहने, ताब्यात घेऊन तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या या कारवाई मुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहिती नुसार,बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या भिकुंड(निर्गुणा)नदीतून चोरट्या मार्गाने रेतीचे उत्खनन करून,ती रेती विक्रीसाठी अकोल्याला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली, त्या माहितीच्या आधारे,अकोला शहरातील जुनेशहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या, राष्ट्रीय महामार्ग धाबेकर फार्म हाऊस जवळ३०सप्टेंबर रोजी सकाळी८ वाजता दरम्यान नाकाबंदी करून,बाळापूरच्या दिशेने येणारे वाहन क्रमांक एम.एच-३०-ए.बी.४७०७,एम. एच.-२६-एच-३९५७ आणि एम. एच.०७-५१६३ माल वाहू वाहने थांबून, नमूद वाहनांची पाहणी केली असता,ती असल्याचे दिसून आले.यारेतीबाबत महसूल विभागाने दिलेला परवाना किंवा कोणत्याही प्रकारची रॉयल्टी,वाहनधारकांकडे नसल्याचे आढळून आले.त्यावरून मोहम्मद मोहम्मद इफतेखार रा.सतरंजी पुरा बाळापूर,साजिदखान हनिफखान रा.इस्लामपुरा बाळापूर, मोहम्मद साजिद मोहम्मद जाबीर या तिघांच्या विरोधात पोलीस स्टेशन जुने शहर मध्ये भादवी३७९,३४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास जुने शहर पोलीस करीत असून, या कारवाईत १७लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.
,