क्राईम

रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ५ बोगस डॉक्टरला  अटक!


मुंबई२०ऑगस्ट:-कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण किंवा कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतांना रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पाच डॉक्टरांंना मुंबई पोलिसांनी अटक केली.गोवंडी परिसरात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतांना तसेच महाराष्ट्र इंडियन मेडिकल कौन्सिलच्या कार्यलयात नोंदणी नसलेले बोगस डॉक्टर, क्लिनिक थाटून,रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याची गोपनीय माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यावर मुंबई पोलिस झोन क्रमांक६चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली बोगस डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत बैगनवाडी परिसरातील अलिशा,आशिफा, मिश्रा, रहेमत नावाने दवाखाना चालविणाऱ्या५डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. परिसरातील आलिशा, आसिफा, मिश्रा, रेहमत, क्षमा या नावाने क्लिनिक चालवणाऱ्या 5 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. अधिकृत वैद्यकीय परवाना आणि महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलमध्ये नोंदणी नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशीररित्या रुग्णांवर उपचार करत होते. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बोगस डॉक्टर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यासाठी त्यांनी महानगर पालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची मदत घेतली.
या बोगस डॉक्टरांकडून स्टेथोस्कोप, वेगवेगळ्या प्रकराचे इंजेक्शन, अॅंटीबायोटीक टॅबलेट्स, सर्जिकल स्ट्रे, सलायन बॉटल्स असे विविध प्रकारची औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहेत. तसंच यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झोपडपट्टीतील अशिक्षित गरीब व्यक्तींवर यात लक्ष्य केले जात होते. सुरुवातील कमी पैशात उपचार करुन नंतर हळूहळू फी वाढवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता. त्यामुळे शारीरिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचा इशारा गुन्हे शाखेने नागरिकांना दिला आहे