क्राईम

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून भरदिवसा पेट्रोल पंपावरील रोकड लुटली

 

औरंगाबाद

औरंगाबाद१२ऑगस्ट; न्यूज डेस्क:-औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद जवळील एका पेट्रोल पंपावरील रोकड रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना१२ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्या घडली,हा लूट केल्याचा प्रकार पेट्रोल पंप वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की,औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद जवळ असलेल्या माळीवाडा येथे असलेल्या पेट्रोल पंपवरील रोकड  कॅश मोजत बसले होते,यावेळी दोन अज्ञात इसम तोंड कापडाने पूर्णपणे झाकून आले.केबिन मध्ये आत प्रवेश केल्याबरोबर त्यातील एका इसमाने त्याच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर काढुन उपस्थित कर्मचाऱ्यांवर रोखून रोख रकमेची मागणी केली.त्यावर कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी रोकड दुसऱ्या इसमाच्या हातात दिली,त्याच्याकडे सुद्धा धारदार चाकू असल्याने, उपस्थित कर्मचाऱ्यांना ,दरोडेखोरांचा विरोध करण्याचे धाडस केले नाही.हातात चाकू असलेल्या दरोडेखोराने हातातील पिशवीत रोकड भरून घटनास्थळावरून दरोडेखोर पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी भेट देउन,सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता,दरोडेखोरांनी सकाळी९ते९.३०वाजता पेट्रोल पंपाची पाहणी करून,नंतर चोरी केल्याचे दिसून येते. पेट्रोल पंपावर झालेल्या या धाडसी चोरीचा तपास औरंगाबाद पोलीस कसा लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे