न्यूज डेस्क 9 ऑगस्ट /दापोली भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात दापोली तालुक्यातून दाखल झालेली ही पहिलीच तक्रार मानली जात आहे.
दिल्ली कॅण्ट येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. यातील प्रकरणात मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवर शेअर करून त्या परिवाराला अडचण निर्माण केल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आल्याचा खुलासा म्हादलेकर यांनी दैनिकाशी केेला. राहुल गांधी यांच्याविरोधात पॉक्सो आणि जुवेनाईल जस्टीस ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी या तक्रारीत म्हादलेकर यांनी केली आहे. या पीडित बालिकेच्या पालकांचे फोटो गांधी यांनी ट्विट केले होते. यामुळे दलित पॉजिटीव्ह मुव्हमेंटचे रवी पी. यांनी ट्विटरला नोटीस दिल्यांनतर ट्विटरने राहुल गांधी यांचे ट्विट डिलिट केले होते.
याचिका दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार आयोग, दिल्ली पोलीस आणि राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. त्यांना या बाबत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. ते या आदेशाला काय उत्तर देतात, हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे