२३ फेब्रुवारी : मुर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जनजागर यात्रेनिमित्य येथे आल्यानंतर खासदार फौजिया खान यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव रविकुमार राठी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
रवि राठी व कुटुंबियांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर रवि राठी यांनी गेली साडेतीन वर्षे बंद असलेली यवतमाळ- अचलपूर दरम्यान धावणारी, मात्र गेली साडेतीन वर्षे बंद असलेली ‘शकुंतला’ रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासाठी त्यांच्या स्तरावरून प्रयत्न करण्याचे साकडे त्यांना घातले व सदर मागणीचे निवेदन त्यांना दिले.
सकारात्मक प्रतिसाद देत ‘शकुंतलेचा वनवास संपविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांना खासदार फौजियाखान यांनी दिले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, वर्षा निकम, रुपाली वाकोडे, मंदा पाटील, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, प्रा. विश्वनाथ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला, निझाम इंजिनियर, राम कोरडे, नासिर भाई, सुषमा कावरे, विष्णू लोडम, विशाल क्षिभाते, दिपाली देशमुख, सविता अडसूळ, रंजना सदार यावेळी त्यांच्या समवेत होते.