Ram-Utsav-Samiti
अकोला

राम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.हुशे तर महिला संयोजक पदी सौ राजश्री शर्मा

अकोला: स्थानीय गांधी चौक परिसरात अनेक वर्षापासून रामनवमीचे देखावे व सांस्कृतिक उपक्रम साकार करणार्‍या राम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवी प्रा डॉ संतोष हुशे यांची तर समितीच्या महिला संयोजक पदी सौ राजश्री शर्मा यांची निवड करण्यात आली.

गांधी चौक परिसरात साकारण्यात आलेल्या समितीच्या कार्यालयात शनिवारी संपन्न झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. आगामी दिनांक ३० मार्च रोजी येत असलेल्या श्रीराम नवमीत अनेक उपक्रम साकारण्यात येणार असून महिलांचा गणगोर व महिला विषयक उपक्रम महिला संयोजिका राजश्री शर्मा व उपसंयोजिका सौ कीर्ती शर्मा तथा सौ रुचिका इंदोरिया साकार करणार आहेत.

या सभेत उभयंताचे पदाधिकार्‍यांनी स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावर्षी नव्या उत्साहात व विविध उपक्रमांच्या माध्यमातून रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असल्याचे मनोगत प्रा डा हुसे तथा सौ शर्मा यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमात यावेळी उत्सव समितीचे महामंत्री भरत कुमार मिश्रा, राधेश्याम शर्मा, पंकज कागलीवाल,श्याम पचोरी, संतोष यादव, दिलीप खत्री, संतोष अग्रवाल, अंबरीश शुक्ला, राजेश सोनाळकर, अमर तिवारी, उमेश लखन, रवी मिश्रा,संजय शर्मा नर्सरी, अजय गावंडे, राजू मंजुळकर,जयकुमार तिवारी, गोविंद शर्मा, अंकुर सुरेका,भूषण इंदोरीया, या ?ड सौरभ शर्मा, सौ सुनीता तिवारी,सौ आशा मंजुळकर, सौ वैशाली सोनाळेकर, सौ दीपा शुक्ला, सौ रेखा शर्मा, सौ भाविका मिश्रा,सौ ममता तिवारी, सौ रितू मिश्रा, सौ सुरेखा गीते, सौ दुर्गा शर्मा, सौ सरला शर्मा, सौ दर्शना गोयनका,सौ मोनिका अनासाने,सौ रेखा मिश्रा समवेत बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.