अकोला

रामनवमीची निघणार १५१दिंडी, झांकीसह भव्य शोभायात्रा,सव्वा लाख रुद्राक्ष वितरण

श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या पत्रपरिषदेत माहिता

अकोला: श्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारा गत ४० वर्षांपासून श्रीरामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते . गुरुवार ३० मार्च रोजी आयोजित शोभायात्रेत १५१ दिंडी, झांकीसह लाखो धर्मप्रेमी नागरिक सहभागी होणार असून श्रीराम नवमनीनिमित्त सव्वालाख रुद्राक्षाचे वितरण केल्या जाणार असल्याची माहिती श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.

रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी आ गोवर्धन शर्मा,समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा,विहिंपचे राहूल राठी,गणेश काळकर,प्रकाश लोढिया,कृष्णा शर्मा, सुनील पसारी आदीच्या उपस्थितीत या सोहळ्याची माहिती देण्यात आली.धर्म संस्कृती,अध्यात्म व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन श्रीरामनवमी शोभायात्रेच्या निमित्ताने होते.

विश्व हिंदू परिषद श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.शनिवार १८ मार्च रोजी राणीसती धाम येथे झांकी दिंडी समितीची बैठक आयोजित केली असून १५१ झांकी दिंडीचा सहभाग शोभायात्रेत राहणार आहे. हिंदू धर्मात रुद्राक्षाचे मोठे महत्त्व सांगितले आहे.भगवान शंकराला प्रिय असलेला रुद्राक्ष दुःख ,दैन्य दारिद्र्य दूर करून भौतिक आर्थिक ,सामाजिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्यभूत ठरतो अशी मान्यता आहे.

श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने सव्वालाख रुद्राक्षाचे वितरण गुडीपाढव्याला शहरातील मुख्य चौकांमध्ये केले जाणार आहे.त्यापूर्वी सोमवार २० मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिर येथे वितरण करण्यात येणार्‍या रुद्राक्षाचे पूजन आयोजित केले आहे.महाराणा प्रताप चौकात श्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारा उभारण्यात येणार्‍या झांकीचे दरवर्षी विशेष आकर्षण असते.

यावर्षीही येथे कण – कण में राम ‘ ही भव्य झांकी उभारण्यात येणार असून बुधवार २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता झांकी स्थानाचे भूमिपूजन तर सोमवार, २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता झांकीचे उद्घाटन केले जाईल . प्रभू श्रीरामाचे चरित्र हा बहुमोल धार्मिक व सांस्कृतिक वारसा असून प्रभू श्रीरामाचे जीवन आदर्श जीवन पद्धतीचे प्रतीक आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने रविवार २६ मार्च रोजी खंडेलवाल भवन येथे रामायणातील विविध प्रसंगावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दुपारी ४ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे.

श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रम,उपक्रम आणि शोभायात्रेत नागरिक बंधू – भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.उत्सवाच्या सफलतेसाठी सर्वसेवाधिकारी आ.गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनात शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा , विहिंपचे राहूल राठी,गणेश काळकर ,सुरज भगेवार , प्रकाश लोढीया,सुनील पसारी , प्रकाश घोगलिया , गजानन दाळू गुरुजी डॉ अभय जैन,डॉ प्रवीण चव्हाण हरिओम पांडे , मनिष बालुका , नविन गुप्ता , सुरेश कुलकर्णी , प्रताप वीरवाणी , नितीन जोशी , संदीप वाणी , निलेश पाठक , संदीप निकम , सुरेश कुलकर्णी , सुरेंद्र जयस्वाल , सुधाकर बावस्कार , अमर कुकरेजा आशिष भीमजियानी , कृष्णा सिसोदिया , संजय दुबे , बाळकृष्ण बिडवाई , नितीन जोशी , विलास अनासाने , किशोर मांगटे पाटीत , वसंत बाछुका , हेमंत सरदेशपांडे , दीपक बजाज , ज्योती टोपले , रेखाताई नालट, दुर्गा जोशी , कमला भोबळे , आशा ईचे , लक्ष्मी अकोटकर , कमला सोनटक्के , विमल नाचवणे , पुष्पा वानखेडे , साधना येवले , छाया तोडसे , संतोषी शर्मा , सारिका देशमुख , मालती रणपिसे , मनीषा भुसारी , चित्रा बापट , अश्विनी सुजदेकर समवेत सर्व पदाधिकारी व सेवाधारी अथक मेहनत घेत आहेत.