क्राईम

खासदार रामदास तडस यांच्या पुत्राविरोधात लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल!

वर्धा५सप्टेंबर:-वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांच्या पुत्राविरोधात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार,नागपूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या कडे तक्रार दाखल केल्याने,राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.पंकज रामदास तडस असं तक्रार दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नांव असल्याची माहिती समोर येत आहे. दाखल केलेल्या तक्रारी नुसार अशी माहिती समोर येत आहे की, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज याचे वर्धा येथील एका युवतीसोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.त्यानंतर पंकजने पीडित युवतीला लग्नाचा बनाव करीत तिचे वारंवार लैंगिक शोषण केले,असा आरोप पिडीतीने पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. आज रोजी हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरू असून, याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.पिडीतीने केलेल्या तक्रारीत तीने, पंकजने तिच्यासोबत लग्न झाल्याचा बनाव केल्याचं नमूद केलं आहे. पीडित तरुणीच्या म्हणन्यानुसार खासदार पुत्र पंकजने कोऱ्या कागदावर सह्या घेऊन लग्न झाल्याचा बनाव करीत आपली फसवणूक केली आहे.परंतु खासदार तडस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार माझा मुलगा पंकज याने तक्रार दार मुलीसोबत लग्न केले असून,आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी तक्रारदार मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नसून, हे प्रकरण आज रोजी कौटुंबिक न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत खासदार पुत्र पंकज तडस याचं काही दिवसांपूर्वी वर्धा येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम संबंध जुळले होते. यानंतर दोघांनीही 6 ऑक्टोबर 2020 रोजी विवाह केला होता. त्यानंतर पंकजसह पीडित तरुणी वर्ध्यात राहायला गेले होते. यानंतर संबंधित तरुणी देवळी येथी तडस यांच्या घरीही राहायला गेली होती. पण कालांतरानं दोघांत वितुष्ट आल्यानं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली आहे.रोशन ठाकूर नावाच्या तरुणाच्या माध्यमातून पंकजनं शिव वैदिक विवाह संस्थेचं कोरं प्रमाणपत्र आणलं होतं. त्यावर माझ्या सह्या घेतल्या. शिवाय काही कोऱ्या कागदांवर देखील सह्या घेण्यात आल्या आहेत. तसेच विविध कारणं देऊन पंकज मला फ्लॅटवर बोलवायचा पण मी रितसर लग्न केल्याशिवाय एकत्र राहण्याला नकार दिला होता. पण त्यानं लग्नाचं आमिष दाखवून सोबत राहायला भाग पाडलं. पंकजनं तगादा लावल्यानंतर आपण दोन महिन्यांनी फ्लॅटवर गेले, असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. पण काही दिवसांनी पंकजने मारहाण करण्यास सुरू केली होती.त्याच प्रमाणे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत,तू माझी पत्नी नसून,ठेवलेली बाई आहेस,अश्या प्रकारे धमक्या देऊन माझ्या मर्जीप्रमाणे तुला राहावं लागणार आहे. असं म्हणत असल्याने मी पोलिसांत तक्रार दिली.असं पीडित तरुणीने तक्रारी म्हटलं आहे.