नागालँडमध्ये आठवले गट दोन जागांवर विजयी
मुंबई: नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवलेंच्या पक्षाला नागालँडमध्ये यश आले आहे.
त्यांच्या नागालँड विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या आहेत. नागालँडमधील तुएनसांग जिल्ह्यातील नोक्सेन विधानसभा जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. या मतदारसंघात एनडीपीपीचे एच. चुबा चँग आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) वाय. लिमा ओनेन चँग यांच्यात चुरशीची लढत होती. या जागेवर वाय. लिमा ओनेन चँग यांनी विजय मिळवला आहे.तुएनसांग सदर-२ मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) इमतीचोबा चांग यांनी विजय मिळवला आहे.
या जागेवर एनडीपीपी, एनपीएफ, काँग्रेस आणि आरपीआय यांच्यात रंजक लढत पाहायला मिळाली. येथे राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्षाचे के. के. ओडिबेंडांग चांग,नागा पीपल्स प्रâंट एच. झुंगकुम चँग, इंडियन नॅशनल काँग्रेस झेड थ्रोंगसो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) इम्तिचोबा रिंगणात होते.
ईशान्येकडील नागालँड राज्य हे देशातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे. नागालँड विधानसभा निवडणूक २०२३ साठी २७ फेब्रुवारी रोजी ६० जागांवर मतदान झाले होते.