अकोला

राठोड तेली समाज महिला मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

अकोला : जुना राठोड पंच बंगला, शिवाजी नगर अकोला येथे राठोड तेली समाज महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार १२ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. तपासणी शिबिर घेण्याकरिता आयुर्वेदिकसौंदर्य तज्ञ डॉ. शोभा पांडव, दंत सौंदर्य व मुख शल्य तज्ञ डॉ. रेखा साहू, स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. दिपाली दिपके यांनी रक्तामधिल शुगर, हिमोग्लोबिन, डेंटल, हेअर, अँड स्कीन केअर आदी तपासणी व त्यावर काय उपचार करावे या बाबातचे मार्गदर्शन देखील करण्यात आले.

शिबिरात येणा-या प्रत्येक महिलेचे पुष्प व महिला दिनाच्या शुभेच्छा देत अनिता भिरड, विद्या मेहेरे, रेश्मा चोपडे, अश्विनी मेहेरे, कांचन वानखडे, प्राजक्ता भिरड, मोनिका नायसे, वैशाली अकोटकार, पुनम खोडके, कल्पना अडचुले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन समाजातील यशस्वी उद्योजिका सोनाली उमाले यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेखाताई नालट यांनी केले तसेच प्रस्ताविक पुष्पा वानखडे यांनी केले.

डॉक्टरांकडुन शिबिरात निशुल्क तपासणी सोबतच निशुल्क औषध देण्यात आले. १२० पेक्षा अधिक महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरा करिता सोनल इचे, वंदना ढवळे, पुष्पा सोनट्टके, पद्मा अडचुले, नीता थोटांगे, कमलबाई सोनट्टके, द्वारकाबाई निखारे, कमलबाई भोंबडे, सुनंदा अवचार, भाग्यश्री ढवळे, झापर्डेताई, जयश्री ढवळे, दिपा निवाने, वर्षा मेहेरे, संगीता वाघाडे, ललिता देशमुख, शर्मिला गिरी, शीतल गिरी, राजेश्वरी सोनट्टके, भाग्यश्री बुलबुले, ज्योती भगत, छाया भगत, चंद्रभागाबाई ढवळे, नीता फंडाट, संगीता चोपडे आदी महिला उपस्थित होत्या. अर्चना गोवर्धनजी शर्मा यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. तर आभार प्रदर्शन पुष्पा गोतमारे यांनी केले.