अकोला: दिवाळीप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडव्यानिमित्त शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी पाडवा दोन दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही रेशन प्राप्त झालेले नाही.
अशातच सरकारी कर्मचार्यांचा संपही सुरूअसल्याने िवतरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येते.विविध घटकांतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते.
शिंदे – फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ गतवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने गरिबांसाठी शंभर रुपयांत चार वस्तू देण्याची घोषणा केली होती. एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलचा संच देण्यात आले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त शिधाजिन्नस संचाचे वाटप शासनामार्फत करण्यात आले होते. आता अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधरकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदीसणांनिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
गोदाम सुरू असल्याने आनंदाचा शिधावितरणप्रक्रियेवर संपाचा फारसा परिणाम होणार नाही. आनंदाचा शिध्यातील िकटमधील वस्तू िमळाव्यात, यासाठीपाठपुरावा सुरू आहे.
-बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.