vidhimandal
महाराष्ट्र राजकीय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून

चार आठवडे चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई : यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक महिना चालणार आहे. या अधिवेशनात ८ मार्च रोजी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येईल. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच विरोधकांनी लोकायुक्तसारखा कायदा मंजूर करण्यासाठी मदत करावी.

या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा आपण प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासुन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील सार्वजनिक हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी अशा अधिवेशनांमध्ये तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी या दोन आयुधांना सर्वाधिक महत्त्व आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मविआने आज बैठक घेतली. यात कॉंग्रेसचे पदाधिकारी अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे आम्ही बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा फोनवरुन केली असे ते म्हणाले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर झालेल्या १० अधिवेशनांत दाखल झालेले प्रश्न, विधिमंडळाने स्वीकारलेले प्रश्न आणि एकूण उत्तरित प्रश्नांची आकडेवारी चकित करणारी आहे.मागील १० अधिवेशनांमध्ये राज्यातील आमदारांनी तब्बल ३८ हजार ३४ तारांकित प्रश्न दाखल केले होते. त्यापैकी विधिमंडळाने फक्त २ हजार ७७६ प्रश्न स्वीकारले आणि त्यापैकी अधिवेशनात अवघ्या २५० प्रश्नांची उत्तरे मिळाली! राज्यात विधानसभेचे एकूण मतदारसंघ २८८ आहेत, आणि मागील दहा अधिवेशनांमध्ये फक्त २५० तारांकित प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत.

प्रश्न दाखल करताना आमदारांकडून होणार्‍या चुकांमुळे प्रश्न स्वीकारण्याचे प्रमाण कमी आहे आणि प्रत्यक्ष अधिवेशनात वेळ कमी आणि गोंधळ अधिक या कारणांमुळे उत्तरे मिळण्याचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.दहापैकी सहा अधिवेशने कोरोनात २०१९ मध्ये राज्य विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक झाल्यापासून ते आजवर एकूण १० अधिवेशने झाली. यातील ६ अधिवेशने कोरोनाकाळात झाली. तीन अधिवेशनांमध्ये तर तारांकित प्रश्न, लक्षवेधींचा समावेश नव्हता.

सामान्यांचा अपेक्षाभंगच सामान्य मतदारांची अपेक्षा असते की आपले आमदार अधिवेशनात आपल्या हिताचे, आपल्या भागातील विकासासंबंधी, समस्यांसंबंधी प्रश्न उपस्थित करून समस्यांची सोडवणूक करतील. मात्र, आजच्या काळात अशी अधिवेशने समस्या सोडवण्याऐवजी राजकीय उट्टे काढण्याचे व्यासपीठ बनले आहे का, अशी शंका येण्यासारखी अधिवेशनातील विविध आयुधांची आकडेवारी आहे.

एकूण कामकाजाचे तास : ३८३ । वाया गेलेले तास : २१ । एकूण बैठका (दिवस) : ५१अनंत कळसे म्हणाले, ‘विधिमंडळाचे माजी सदस्य बी. टी. पाटील सांगत, समजा एखाद्या गावाला एसटी बस सुरू करण्याच्या मागणीचा तारांकित प्रश्न मांडायचा झाल्यास त्यावर एक-दोन व्यक्तींच्या सह्यांचे निवेदन देण्याऐवजी दीड ते दोन हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन हवे. म्हणजे लोकांची मागणी किती तीव्र आहे, हे स्पष्ट होते.’