मुंबई: राज्यात मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. या योजनेंतर्गत येत्या ३ वर्षांत राज्यात इतर मागासवर्गाRयासाठी १० लाख घरे बांधण्यात येतील. या योजनेसाठी १२ हजार कोटी राज्य सरकार उपलब्ध करून देईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांसाठी घरे या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार राज्य सरकारही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेत आहे.
राज्यातील ग्रामीण भागात १० लाख घरे बांधण्याची सरकारची योजना आहे. यातील ३ लाख घरे हे पुढील वर्षी २०२३-२४ मध्येच बांधून पूर्ण होतील. यासाठी ३ हजार ६०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.पुढे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, शहरी भागातही आता स्थलांतरीत महिला नोकरदारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, शहरात त्यांच्या निवासाची सोय नसते.
त्यामुळे शहरी भागात महिला नोकरदारांसाठी ५० वसतिगृह बांधण्यात येतील. त्यामुळे महिलांची मोठी सोय होईल.देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेत यावर्षाr ४ लाख घरे बंधून पूर्ण करण्यात येतील. यातील अडीच लाख घरे ही अनुसूचित जाती, जमातींसाठी असतील. दीड लाख घरे इतर प्रवर्गासाठी असतील.देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, रमाई आवास योजनेसाठी यावर्षाr ११०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून दीड लाख घरकुल बांधण्यात येतील. यातील किमान २५ हजार घरे मातंग समाजासाठी असतील.
शबरी, पाधरी व आदीम आवास योजनेत १२०० कोटी खर्चून एक लाख घरे बांधून देण्यात येतील. यशवंतराव मुक्त वसाहत योजनेत मुक्तविमुक्त जाती जमातींसाठी २५ हजार घरे बांधून देण्यात येतील. यासाठी ६०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.राज्यात मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
या योजनेंतर्गत येत्या ३ वर्षांत राज्यात इतर मागासवर्गाRयासाठी १० लाख घरे बांधण्यात येतील. या योजनेसाठी १२ हजार कोटी राज्य सरकार उपलब्ध करून देईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.