महाराष्ट्र

राज्यात एकाच दिवशी १० लाखाच्या वर नागरिकांना लस!

मुंबई२२ऑगस्ट:-मुंबई राज्यात कोरोनाच्या लसीकरण ला वेग आला असून,२१ऑगस्ट रोजी  एकाच दिवशी १०लाखांच्यावर नागरिकांना कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आला. राज्यातील १०लाख९६हजार नागरिकांना कोरोनाच्या लसीचे डोस दिल्या असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे महाराष्ट्र देशातील एकाच दिवशी सर्वाधिक लस देणारे एकमेव राज्य ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.महाराष्ट्रात एकाच दिवशी११लाखाच्या जवळपास कोरोना लसीकरण झाल्याने,एकाच दिवशी किमान१० लाख नागरिकांचे लसीकरण होऊ शकते,हे महाराष्ट्रातील आरोग्य विभागाने देशाला पटवून दिले आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सात वाजेपर्यंत ५ हजार २०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २१ऑगस्टच्या संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना कोरोनाच्या लसीचे टिकाकरण करण्यात आले. या अगोदर ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती. त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या आदल्या दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला होता. २१ऑगस्टच्या रोजी झालेल्या लसीकरणच्या संख्येने विक्रम करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे