ताज्या बातम्या

 राज्यातील ६ विधानपरिषदेच्या जागांसाठी १०डिसेंबरला मतदान!  निवडणूक आयोगाचा कार्यक्रम  जाहीर

 

MLC Election 2021 राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक आयोगाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई ९नोव्हेंबर:- महाराष्ट्रातील  ५ मतदारसंघातील विधानपरिषदेच्या ६ जागांवर १०डिसेंबर २०२१रोजी मतदान घेण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने  जाहीर केली आहे.राज्य निवडणूक आयोगाने  निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले असून, राज्यातील एकूण ८ विधानपरिषद सदस्यांचाX

आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामदास कदम, काँग्रेस नेते भाई जगताप यांचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात येईल तर निवडणुकीचा निकाल ४ दिवसानंतर १४ डिसेंबर २०२१ रोजी लागेल. कोरोना काळानंतर राज्यातील विधानपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असेल.

राज्यातील विधानपरिषदेच्या एकूण ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील दोन जागा आहेत. तर कोल्हापूर, धुळे, अकोला आणि नागपूर या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सदस्यांची मुदत संपत आली असल्यामुळे या निवडणुका घेण्यात येत आहे. ६ जागांवरील सर्व सदस्यांची विधानपरिषदेवरील मुदत ही १ जानेवारी २०२२ रोजी संपणार आहे.

विधानपरिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणाऱ्या नेत्यांमध्ये मुंबईतून शिवसेना नेते रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, भाजपचे अमरिश पटेल, शिवसेनेचे गोपी किशन बाजोरिया, गिरीश व्यास, भाजपचे प्रशांत परिचारक, अरुण जगताप या नेत्यांचा समावेश आहे.

या ६ जागांवर होणार निवडणूक

मुंबईत दोन जागांवर निवडणूक होईल – रामदास कदम, भाई जगताप
कोल्हापूर सतेज पाटील
धुळे-नंदुरबार – अमरिश पटेल
अकोला – गोपी किशन बाजोरिया
नागपूर – गिरीश व्यास
सोलापूर – प्रशांत परिचारक
अहमदनगर – अरुण जगताप

असं आहे निवडणुकीचे वेळापत्रक

राज्य निवडणूक आयोगाकडून १६ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटीफिकेशन काढण्यात येईल.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत असेल.
उमेदवारी अर्ज पडताळणी २४ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येईल.
उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा असल्यास २६ नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकतो.
विधानपरिषदेसाठी १० डिसेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मतदान घेण्यात येईल.
मत मोजणी १४ डिसेंबरला करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात येईल