chhatrapati-shivaji-maharajs-birth-anniversary-was-celebrated-in-thane-municipal-corporation-with-the-presentation-of-the-maharashtra-state-anthem
ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यगीताच्या सादरीकरणाने ठाणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

ठाणे, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पोवाडा.. नृत्य आणि ‘गीत जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सादरीकरणाने महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त् 2 संजय हेरवाडे, परिवहन सभापती विलास जोशी यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त्, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गीतकार राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांच्या आवाजात अजरामर ठरलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र शासनाने राज्यगीतांचा दर्जा दिला. आज शिवजयंतीच्या दिनी प्रारंभी सभागृहात या गीताचे सादरीकरण करण्यात आले. तद्नंतर ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. 64 च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडणारा पोवाडा सादर केला. तर शाळा क्र. 18 च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे गौरव गीत सादर केले. शिक्षिका सविता शिंदे व प्रेरणा कदम यांनी ‘म्यानातून उसळे तलवारीची धार’ हे गीत सादर केले.

या कार्यक्रमास महापालिका शाळांतील विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी केले.

मासुंदा तलाव व कळवा येथेही अभिवादन

मासुंदा तलाव येथील शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यास महापालिका आयुकत् अभिजीत बांगर व अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त् प्रशांत रोडे, शंकर पाटोळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे कार्यालयीन अधीक्षक दत्ता गोंधळी उपस्थित होते. तसेच कळवा नाका येथील शिवरायाच्या प्रतिमेस उपायुक्त प्रशांत रोडे व सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.