bal-snehi-bus-003
महाराष्ट्र

रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठीच्या बालस्नेही बसचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे, दि. २१ – रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून महिला व बालविकास विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पथकाच्या राज्यातील पहिल्या बालस्नेही  बसचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात  आले.

bal-snehi-bus-003

जिल्ह्यातील रस्त्यांवर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना शिक्षण व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत फिरत्या पथकाचा प्रकल्प केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता.

bal-snehi-bus-003

या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी देऊन ५० लाखांचा निधीही दिला. या बसमधील मुलांना आहार व शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे.  हा प्रकल्प राज्यातील ठाणे जिल्ह्यासह पुणे, नाशिक, मुंबई शहर व उपनगर तसेच नागपूर या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

या पथकासाठी बालस्नेही बस देण्यात येणार असून राज्यातील या पहिल्या बसचे उद्घाटन आज ठाण्यात झाले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी आदी उपस्थित होते.

bal-snehi-bus-003

बसमध्ये अश्या सोयी सुविधा ….

  • एका बसमध्ये २५ मुलांची सोय
  • ठाणे जिल्ह्यातील सहा ठिकाणी बस फिरणार
  • बसमध्ये एक समुपदेशक, शिक्षक-शिक्षिका, वाहनचालक आणि काळजी वाहक असे चार कर्मचारी असणार
  • स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी
  • बसमध्ये सीसीटीव्ही व ट्रॅकिंग सिस्टीम असणार