maitri-morning-group
अकोला

रस्त्याच्या कडेला मूर्ती टाकून मूर्तीची विटंबना करू नये; मैत्री मॉर्निंग वॉक ग्रुप

बोरगाव मंजू : अकोला श्री संत गजानन महाराज सेवा समिती राजाराम नगर चाळीस कॉटर समोर गुडधी रोड मोठी उमरी अकोला व मैत्री मॉर्निंग वॉक ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा महाकाली नगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव कृषी विद्यापीठ यामधील रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या देव-देवतांच्या मूर्तींचे मूर्ती संकलन उपक्रम राबवण्यात आला.

यानिमित्त मैत्री मॉर्निंग वॉक ग्रुपने जनतेला आव्हान केले कोणीही कृपया रस्त्याच्या कडेला मूर्ती टाकून मूर्तीची विटंबना करू नये आपण मूर्ती श्री संत गजानन महाराज मंदिर येथे आणून देऊ शकता आम्ही त्याच रीतसर विसर्जन करू.