क्राईम

*रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना भरधाव वाहनाने उडविले* *सदर अपघातातील दोघे गंभीर जखमी*

 

प्रमोद कढोने पातूर : वाशीमकडून बाळापूर कडे जात असलेल्या कंपनीच्या बोलेरो गाडीने पातूरमधील संभाजी चौकात उभ्या असलेल्या दोन इसमास दारू पिऊन वाहन चालवत असलेल्या बोलेरो चालकाने भरधाव वेगाने उडविल्याची घटना घडली आहे
घटनेचे सविस्तर वृत्त अशाप्रकारे की,पातूर – बाळापूर रोडवरील संभाजी चौक येथे उभे असलेल्या दोन व्यक्तीना भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो कंपनीच्या गाडीने उडविले.सदर गाडी चालक हा मद्यधुंद अवस्थेत असून बोलण्याच्या वा चालण्याच्या अवस्थेत नसतानाही बोलेरो कंपनीची नवीन असलेली विना नंबरची गाडी सुसाट वेगाने चालवीत असतांना पातूर येथील जुन्या बस्थानाकावर मो.शाकिर यास कट मारून समोरच्या संभाजी चौकात उभे असलेले गणेश किसन बंड (वय 42) व सुनील गुलाबराव पाटील (वय 38) दोघेही रा.नानासाहेब नगर पातूर यांना रस्त्याच्या कडेला उभे असतांना दारूच्या नशेत वाहनावरील नियंत्रण सुटल्याने धडक दिली.यात गणेश बंड यांच्या डोक्यात,उजव्या पायाला व डाव्या हाताला तसेच सुनील पाटील यास डाव्या पायाला,उजव्या हाताला तसेच डोक्यात गंभीर इजा झाली असल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी व काही गावातील नागरिकांनी गर्दी केली असल्याने पातूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता सदर बोलेरो चालक देविदास तुकाराम (वय 45) रा.बालनेवाडी,वाराणसी यास ताब्यात घेतले असून जखमींचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी पातूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी आले होते,दरम्यान वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.