अकोला

रविवार रोजी होणार जलाराम मंदिराचा २० वा पाटोत्सव सोहळा

अकोला: सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक सेवेत सक्रिय असणार्‍या स्थानीय बिर्ला गेट परिसरातील संत जलाराम मंदिर येथे मंदिराच्या २० व्या पाटोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री जलाराम मंदिर,लोहाना महाजन ट्रस्ट,जलाराम सेवा भजन मंडल, रघुवंशी मंगल कार्यालय, लोहाना विद्यार्थी भवन ट्रस्ट,लोहाना महिला मंडळ व नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ मार्च रोजी स्थानीय बिरला गेट परिसरातील जलाराम मंदिरात हा २० वा भक्तिमय पाटोत्सव सोहळा होणार आहे.

या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योगपती, अमरावती निवासी बिपिनबाई शांतीलाल शाह तथा मुंबईचे उद्योजक विशालभाई प्रवीणकुमार ठक्कर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते संत जलाराम बाप्पाच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक आरतीचा कार्यक्रम होणार आहे.

या नंतर सकाळी १० वाजता लोहाना समाजाच्या ज्येष्ठ महिला- पुरुष नागरिकांचा सन्मान सोहळा होणार आहे.या पाटोत्सव निमित्त विविध उपक्रम मंदिरात आयोजित करण्यात आले आहे.मंदिराच्या या भक्तिमय पाटोत्सव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्यात समाजाच्या महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री जलाराम मंदिर,लोहाना महाजन ट्रस्ट,जलाराम सेवा भजन मंडल, रघुवंशी मंगल कार्यालय,लोहाना विद्यार्थी भवन ट्रस्ट,लोहाना महिला मंडळ व नवयुवक मंडळाच्या समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यानी केले.