अकोला

रविवारी महानगरात भव्य गीता मैत्री मिलन सोहळा ;डॉ.आशू गोयल यांची राहणार उपस्थिता

अकोला: राष्ट्रीय स्तरावर समाजात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भगवद्गीतेचा व्यापक प्रचार व प्रसार करून लोकजागृती करणार्‍या गीता परिवार अकोलाच्या वतीने महानगरात गीता मैत्री मिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रविवार दि १२ मार्च रोजी ९- ३० ते दु १ वाजेपर्यंत स्थानीय गौरक्षण रोड येथील शुभमंगल सभागृहात हा मैत्री मिलन सोहळा होणार आहे. यात मार्गदर्शक म्हणून लखनऊ येथील लर्न गीता चे प्रचारक व गीता परिवारचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.आशू गोयल उपस्थित राहणार आहे.महानगरात प्रथमच आयोजित या सोहळ्यात अमरावती, वाशिम,बुलढाणा अकोला येथील महिला पुरुष साधक मोठया संख्येने उपस्थित राहून डॉ.आशू गोयल यांचे मार्गदर्शन प्राप्त करणार आहेत.

या सोहळ्यात भगवद्गीताचे अठरा अध्याय मुखोदगत असणार्‍या पंधरा साधकांची उपस्थिती राहणार आहेत.सर्वांसाठी मोफत असणार्‍या या गीता मैत्री मिलन उत्सवात महिला पुरुष साधकांनी सहभागी होऊन या गीता यात्रेला एक नवीन दिशा देण्याचे आवाहन विमल गोयनका,सौ कल्पना भुतडा,सौ जया जाजू समवेत गीता परिवार अकोला च्या सर्व पदाधिकार्‍यांनी केली.