राजकीय

रजनीकांत मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर पहिला वनडे क्रिकेट सामना पाहण्यासाठी रजनीकांत कुटूंबासह मुंबईत आहेत. रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत, त्यामुळे ते मातोश्रीवर आले आहेत. ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सिम चाहते आहेत. रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळेच रजनीकांत ठाकरे कुटुंबीयांची सदिच्छा भेटीसाठी आले होते, असे सांगितले जात आहे.